PF Account Balance: पीएफ खात्यावरील व्याज तपासण्याची सोपी पद्धत, घ्या जाणून
PF Account Balance | (Photo Credits: File Imagre)

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (Employees Provident Fund) म्हमजेच सर्वसामान्यांच्या तोंडावर असलेला पीएफ (PF) प्रत्येक कंपनीला आपल्या कर्मचाऱ्याच्या नावे त्याच्या खात्यावर जमा करावाच लागतो. कर्मचाऱ्याच्या भविष्यासाठी ही रक्कम त्याच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (Employees' Provident Fund Organisation) द्वारा उपलब्ध करुन दिलेल्या EPFO अकाऊंटवर जमा केली जाते. त्यावर भक्कम व्याजही मिळते. त्यामुळे पीएफची रक्कम आणि व्याज या सर्वांची मिळून हळूहळू मोठी रक्कम जमा होत राहते. मात्र कधीकधी होते असे की, कंपनीकडून पीएफची रक्कम कर्मचाऱ्याच्या भविष्य नर्वाह निधी खात्यावर म्हणजेच पीएफ अकाउंट (PF Account) वर जमा होत नाही किंवा त्यावरचे व्याज जमा होत नाही. अशा वेळी ही रक्कम जाणून घेण्याची ही सोपी पद्धत तुम्ह अवलंबू शकता.

आपण जर आपले पीएफ अकाऊंट केवायसी पूर्ण केलेअसेल तर प्रत्येक महिन्याला आपला पीएफ डिटेक्ट होताच आपल्या नोंदणीकृत मोबाईलवर तशी माहिती मिळते. आपणही वेळोवेळी पीएफची रक्कम तपासू शकता. त्यासाठी पुढील पद्धती जाणून घ्या.

EPFO वेबसाईट

EPFOच्या अधिकृत वेबसाईट epfindia.gov.in वर आपणास लॉग इन करावे लागेल. वेबसाईटवर लॉग इन झाल्यावर वेबसाईटच्या वरच्या आणि डाव्या बाजूला आपल्याला ई-पासबुक ची लिंक मिळेल. त्यावर क्लिक करा. इथे क्लिक केल्यावर आपल्यासमोर passbook.epfindia.gov.in चे पेज ओपन होईल. इथे आपण आवश्यक गोष्टी भरा. जसे की यूजरनेम, पासवर्ड आदी. यूजरनेम म्हणजे आपला UAN म्हणजेच यूनिवर्सल अकाउंट नंबर. हा नंबर आपल्या सॅलरी स्लिपवरही उपलब्ध असतो. (Aadhaar Card शी लिंक असलेला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी विसरलात? या सोप्या स्टेप्सने करा Verify)

लॉग इन केल्यानंतर आपल्याला आपल्या उपलब्ध मेंबर आयडी सिलेक्ट करावा लागेल. आपण जर इतर संघटनांमध्ये काम केले असेल तर आपल्याकडे इतरही काही मेंबर आयडी असू शकतात. उपलब्ध मेंबर आयडीवर सिलेक्ट केल्यावर आपल्याला ईपीएफ ई पासबुक अथवा ईपीएफ पासबुख दिसू शकेल.

फक्त एक मिसकॉल द्या

आपल्या नोंदणीकृत मोबाईल वरुन 011-22901406 या क्रमांकवर एक मिसकॉल द्या. जर आपला UAN आपल्या बँक उकाऊंट नंबर,आधार आणि पॅन नंबरशी जोडलेला असेल तर आपल्याला पीएफ बॅलन्सबाबत शेवटची अपडेट पाहायला मिळेल. आपला मोबाईल नंबर युनिफाईड पोर्टलवर UAN सोबत एक्टिवेटेड असायला पाहिजे.