EPFO कडून नोकरदार वर्गाला खबरदारीचा इशारा, पैशांबाबत येणाऱ्या खोट्या फोन, मेसेजवर विश्वास न ठेवण्याची सुचना
EPFO (Photo Credits-Facebook)

कर्मचारी भविष्य निधी संगठन (EPFO) यांच्याकडून नोकरदार वर्गाला अलर्ट केले आहे. कारण प्रत्येक्ष क्षेत्रात सध्या फसवणुकीचे प्रकार समोर येत असल्याने त्याबाबत सावध राहण्याची सुचना देण्यात आली आहे. नोकरदार वर्गाने वेबसाईट, टेलिफोन कॉल्स, एसएमएस, इमेल, सोशल मीडिया किंवा फेक ऑफर्स पासून दुर रहावे असे सांगण्यात आले आहे. इपीएफओ यांनी त्यांच्या ग्राहकांना सांगितले आहे की, जर तुमच्याकडे कोणीही एखादे काम करण्यासाठी पैसे बँकेत भरण्यास सांगत असेल तर सावध व्हा. असे करणे तुम्हाला संकटात पाडू शकते.

कंपनीने ग्राहकांना सुचना देत म्हटले आहे की, तुम्हाला क्लेम सेटलमेंट , अॅडवान्स, अधिक पेन्शन किंवा कोणत्याही सुविधेबबात बँकेत पैसे जमा करण्यास सांगितले जाईल. परंतु हे खोटे असून त्यापासून दूर रहा. इपीएफओ यांनी ट्वीट करत याबाबत अधिक माहिती दिली आहे. ग्राहकाने त्यांचा आधार कार्ड क्रमांक, पॅन, बँक खात्यासंबंधित माहिती किंवा कोणती ही व्यक्तिगत माहिती देऊ नये. तसेच UAN क्रमांक सुद्धा फोनवरुन कोणासोबत शेअर करु नका. कंपनी ग्राहकाकडून कोणतीच त्याची व्यक्तिगत माहिती किंवा खात्यासंबंधिक माहिती फोनवरुन विचारत नसल्याची स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे खोट्या मेसेज किंवा फोनला बळी पडू नका अशी सुचना देण्यात आली आहे.(Women Officers in Army: भारतीय लष्करामध्ये तुकडीचं नेतृत्त्व महिलांकडे देण्यावरून केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; 3 महिन्यात कमिशन स्थापन करण्याचेही आदेश)

जर तुम्ही खोट्या फोन किंवा मेसेज नुसार तुमची फसवणूक झाल्यास मिनिस्ट्री ऑफ लेबर अॅन्ड एम्पलॉयमेंटच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, येथे तुम्हाला तुमची तक्रार नोंदवता येणार आहे. तसेच इपीएफओ यांचा टोल फ्री क्रमांक ग्राहकांसाठी 24 तास सुरु असतो.