Environmental Changes & Monsoon In India: 40 वर्षांत 38 टक्के जिल्ह्यांमध्ये पर्जन्यमानामध्ये वाढ- CEEW च्या पाहणीचा निष्कर्ष
Rain | representative pic- (photo credit -pixabay)

काउन्सिल ऑफ एनर्जी, एन्व्हायर्नमेंट अँड वॉटर (CEEW) ने आज प्रसिद्ध केलेल्या एका स्वतंत्र पाहणीनुसार बहुतांश भारतामध्ये नैऋत्य मोसमी पर्जन्यवृष्टीच्या टक्केवारीत वाढ झाल्याचे दिसत आहे. भारतामध्ये सुमारे 55 टक्के तालुक्यांमध्ये मागील 10 वर्षांमध्ये म्हणजेच 2012 ते 2022 या मध्ये  10 टक्क्यांहूनही अधिक वाढ झाल्याचे दिसून आले आहे. यात राजस्थान, गुजरात, मध्य महाराष्ट्र आणि तमिळनाडूचे काही भाग अशा पारंपरिकदृष्ट्या कोरड्या समजल्या जाणाऱ्या प्रांतांमधील तालुक्यांचाही समावेश आहे. यापैकी जवळ-जवळ एक चतुर्थांश तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये पर्जन्यमानामध्ये 30 टक्क्यांची प्रामुख्याने वाढ झाल्याचे दिसत आहे. भारताच्या 4500  हून अधिक तालुक्यांमधील चाळीस वर्षांच्या कालावधीतील (१९८२-२०२२) पर्जन्यमानाचे बारकाईने विश्लेषण करणाऱ्या डिकोडिंग इंडियाज चेंजिंग मान्सून पॅटर्न्स या CEEW च्या पाहणीमधून मान्सूनचे गेल्या दशकातील वेगाने बदलणारे स्‍वरूप दिसून येत आहे. हवामान बदलाचा वाढता वेग या बदलास कारणीभूत असू शकेल. असेही सांगण्यात आले आहे.

हवामान बदलाचा भारताच्या मान्सूनवर परिणाम होत आहे, अल्पकाळात होणाऱ्या मुसळधार पावसाचे प्रमाण वाढत आहे. म्हणजेच कमी वेळेत मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. यामुळे अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यास वेळ मिळत नसल्याने पाणी तुंबण्याच्या, पूर येण्याचा समस्या वाढल्या आहे. El Nino & La Nina: अल निनो, ला निनाचा उत्तरेतील मान्सूनवर मोठा तर, मध्य भारतात कमी प्रभाव- IITM, Pune .

अहवालातील निष्कर्षानुसार, राजस्थान, गुजरात आणि मध्य महाराष्ट्रातील तुलनेने कोरड्या भागांमधील पर्जन्यवृष्टीमध्ये गेल्या दहा वर्षांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. गंगेचे खोरे, ईशान्य भारत आणि हिमालयीन क्षेत्रांमध्ये वसलेल्या ११% तालुक्यांमध्ये घट दिसून आली आहे.