Job प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

Employment Opportunities During Festive Season: भारतातील नोकऱ्यांची परिस्थिती अजूनही बिकट आहे. एकीकडे नवीन नोकऱ्या निर्माण होत आहेत, मात्र दुसरीकडे बेरोजगारीही वाढत आहे. विशेषतः तरुण आणि महिलांमध्ये बेरोजगारीची समस्या अधिक पहायला मिळत आहे. आता त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे, भारतातील आगामी सणासुदीच्या हंगामात 10 लाखांपर्यंत नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे गिग आणि महिला कर्मचा-यांच्या सहभागामध्ये लक्षणीय वाढ होईल. आगामी सणासुदीच्या सिझनमध्ये व्हाईट कॉलर आणि ब्लू-कॉलर दोन्ही पोझिशन्स 35 टक्क्यांनी वाढतील.

तंत्रज्ञान आणि डिजिटल टॅलेंट सोल्यूशन्स प्रदाता एनएलबी सर्व्हिसेसच्या मते, महिला गिग इकॉनॉमीमध्ये उपलब्ध असलेल्या लवचिकता आणि विविध भूमिकांकडे अधिकाधिक आकर्षित होत आहेत, ज्यामध्ये ब्रँड ॲडव्होकेसी, सौंदर्य, ऑनलाइन शिकवणी, घरगुती मदत, टॅक्सी ड्रायव्हिंग आणि फूड डिलिव्हरी अशा भूमिकांचा समावेश होतो.

यासह रिटेल, हॉटेल, ई-कॉमर्स, लॉजिस्टिक्स, ग्राहकोपयोगी वस्तू, बँकिंग, वित्तीय सेवा, विमा अशा अनेक उद्योगांमध्ये नोकऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. एनएलबी सर्व्हिसेसचे सीईओ सचिन अलुग म्हणतात की, डिलिव्हरी ड्रायव्हर्स, ग्राहक सेवा प्रतिनिधी, टेक सपोर्ट स्पेशलिस्ट आणि फ्रीलान्स इंजिनीअर्सची मागणी वाढत आहे. या उद्योगांमध्ये, ई-कॉमर्सला गेल्या वर्षीच्या तुलनेत 22 टक्के वाढीसह सर्वाधिक मागणी दिसेल. (हेही वाचा: Samsung India Layoffs: सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्समध्ये होणार नोकरकपात; कंपनी भारतामधील 9 ते 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकणार)

दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, चेन्नई आणि कोलकाता यांसारख्या प्रमुख मेट्रो शहरांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत या सणासुदीच्या हंगामी भरतीमध्ये 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर नागपूर, जयपूर, वडोदरा, कोची, विझाग, मदुराई, लखनौ, गुरुग्राम, चंदीगड, इंदूर, कोईम्बतूर, सूरत, भुवनेश्वर आणि भोपाळ या टायर 2 शहरांमध्ये 20 ते 25 टक्के वाढ झाली आहे. या सणासुदीच्या हंगामात नोकरीच्या संधींमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. या नवीन भूमिकांपैकी, अंदाजे 70 टक्के हंगामी मागणी पूर्ण करण्यासाठी तात्पुरत्या असतील, तर उर्वरित 30 टक्के कायमस्वरूपी राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे अधिक स्थिर, दीर्घकालीन पदे मिळतील.