लॉकडाऊन अनेकांच्या नोक-या गेल्या. तर अनेकांना कमी पगाराच्या नोक-यांवर समाधान मानावे लागले. अशा परिस्थितीत आर्थिक चणचण भागवायची कशी असा मोठा प्रश्न अनेकांपुढे निर्माण झाला आहे. अशा वेळी ESIC ने 21,000 पेक्षा कमी पगार असणा-या नोकरदार वर्गासाठी विशेष सेवा सुरु करणार असल्याची घोषणा केली आहे. यात पात्र कर्मचा-यांना 1 एप्रिलपासून 735 जिल्ह्यांमध्ये ESIC योजनेअंतर्गत आरोग्य सेवा मिळणार आहे. न्यूज 18 लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, आतापर्यंत ही सेवा 387 जिल्ह्यांमध्येच होती. 187 जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणातच आरोग्य सेवा उपलब्ध होत्या. तर 161 जिल्ह्यांमध्ये ही सेवा ESIC लाभार्थ्यांना मिळतच नव्हती.
ESIC योजनेअंतर्गत 21 हजारांपेक्षा कमी पगार असणा-या कर्मचा-यांना या आरोग्य सेवेचा पुरेपूर फायदा होणार आहे. एम्प्लॉयीज स्टेट इन्श्युरन्स कार्पोरेशनचा करार असलेल्या रुग्णालयांमध्येच उपचार घेता येत होते. आता पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत (ABPMJAY) ईएसआयसी लाभार्थ्यांना सर्वत्र आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत.हेदेखील वाचा- BARC Recruitment 2021: नर्स ते ड्रायव्हर बीएआरसी मध्ये 63 जागी नोकरभरतीसाठी barc.gov.in वर करा 15 फेब्रुवारी पूर्वी अर्ज
बुधवारी (27 जानेवारी) झालेल्या बैठकीत स्थायी समितीनं ईएसआयसी लाभार्थ्यांना पंतप्रधान जन आरोग्य योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी प्रस्तावित बजेटला मंजुरी दिली आहे. त्यामुळं ईएसआयसी सदस्यांना 1 एप्रिल 2021 पासून देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये आरोग्य सेवा उपलब्ध होतील.
नवीन ठिकाणी आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याकरता ईएसआयसीनं नॅशनल हेल्थ अथॉरिटीबरोबर (NHA) एक सामंजस्य करार केला असून, यामुळं ESIC लाभार्थ्यांना ABPMJAY पॅनेलच्या रुग्णालयांमध्ये आरोग्य सेवा मिळेल. देशातील कोणत्याही ABPMJAY रुग्णालयात ESIC कर्मचाऱ्यांना सेवा मिळेल अशी माहिती एस. पी. तिवारी यांनी दिली.
नेमकी काय आहे ही ESIC ची ही योजना?
महिन्याला 21,000 वा त्यापेक्षा कमी पगार असणा-या औद्योगिक कर्मचा-यांचा ईएसआयसी योजनेत समावेश होतो. दर महिन्याला त्यांच्या पगारातून एक ठराविक रक्कम कापून घेऊन ती आरोग्य सुविधांसाठी जमा केली जाते. 0.75 टक्के रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारातून तर 3.25 टक्के रक्कम कंपनीद्वारे जमा केली जाते. त्यामुळे पात्र कर्मचा-यांनी वेळप्रसंगी या सेवेचा लाभ घेण्यासाठी योग्य ती कागदपत्रे जवळ बाळगणे गरजेचे आहे.