BARC Recruitment 2021: नर्स ते ड्रायव्हर बीएआरसी मध्ये 63 जागी नोकरभरतीसाठी  barc.gov.in वर करा 15 फेब्रुवारी पूर्वी अर्ज
JOB प्रतिकात्मक फोटो (File Photo)

भाभा अ‍ॅटोमॅटिक रिसर्च सेंटर (BARC) मध्ये नर्स, ड्रायव्हर, स्टायपेंट वर ट्रेनी आणि अन्य काही पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार त्यांच्या पसंतीच्या पदासाठी barc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर 15 फेब्रुवारी पूर्वी ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतात. या नोकरभरतीच्या द्वारा 63 जागांवर नोकर भरती केली जाणार आहे. त्यापैकी 53 जागा या थेट नोकरभरतीद्वारा भरल्या जाणार आहेत तर 10 जागांवर स्टायपेंटरी ट्रेनी असतील.

बीएआरसी एक्झाम 2021 मध्ये लेखी परीक्षा किंवा फिजिकल असेसमेंट टेस्ट/ मुलाखत यांच्याद्वारा उमेदवार निवडले जणार आहेत. अर्जांची छाननी केल्यानंतर काही उमेदवार शॉर्टलिस्ट केले जाणार आहेत. त्यानंतर त्यांना फिजिकल असेसमेंट, लेखी परीक्षा, स्किल टेस्ट किंवा मुलाखतीसाठी बोलवलं जाईल. PWD Engineer Recruitment: 'या' पद्धतीने केली जाते पीडब्ल्यूडी अभियंता भरती; पात्रता, वेतन आणि निवड प्रक्रियेविषयी सविस्तर जाणून घ्या.

BARC Recruitment 2021 साठी अर्ज कसा कराल?

barc.gov.in या बीएआरसीच्या वेबसाईटला भेट द्या.

नवे युजर असाल तर तुम्हांला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे.

रजिस्ट्रेशन झाल्यानंतर इमेल आणि पासवर्ड वापरून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकाल.

Job Application च्या टॅबमधून अप्लाय ऑनलाईन चा पर्याय निवडा.

तुमची सारी माहिती त्यामध्ये अपडेट करून अ‍ॅप्लिकेशन फी भरून हा अर्ज तुम्ही सबमीट करू शकता.

इथे पहा BARC Recruitment 2021 चं अधिकृत नोटिफिकेशन 

दरम्यान उमेदवारांना अ‍ॅप्लिकेशन फी किमान 100 ते 500 रूपये इतकी भरावी लागणार आहे. बीएआरसीच्या 63 विविध पदांनुसार ही फी वेगवेगळी आकारली जाणार आहे.