Education Budget 2020 Highlights: केंद्रीय अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रात काय मिळाल्या सुविधा; वाचा सविस्तर
Representational Image | (Photo Credits: PTI)

Education Budget 2020-21 Highlights: यंदाचे केंद्रीय अर्थसंकल्प शिक्षण क्षेत्रासाठी खूपच महत्त्वाचे आणि फायदेशीर होते असे म्हणायला हरकत नाही. यात या बजेटमध्ये शिक्षण क्षेत्रासाठी अनेक तरतुदींचा पाऊस पाडण्यात आला. ज्यात सर्वात मोठी घोषणा म्हणजे 2020-21 मध्ये शिक्षणासाठी एकूण 99,300 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच सरकार या क्षेत्रात FDI आणण्याचा देखील विचार करत आहे. कौशल विकासासाठी 3000 कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. इतकेच नव्हे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी असेही सांगितले की, देशात राष्ट्रीय पोलिस विद्यापीठ आणि राष्ट्रीय न्यायिक विज्ञान विद्यापीठ उभारण्याचा देखील सरकार विचार करत आहे.

निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची गरज आहे असेही त्या म्हणाल्या. नवे शिक्षण धोरण लवकरच अमलात आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पाहूयात शिक्षण क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदी:

1) जल जीवन मिशनसाठी 3.6 लाख कोटीं, सर्वांपर्यंत ऑनलाईन डिग्री कोर्स सुरु करणार

2) विदेशी विद्यार्थ्यांसाठी स्टडी इन इंडिया योजना सुरु करणार

3) गरीब विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अभ्यासक्रमांची सुरुवात करणार

4) स्किल इंडियासाठी 3 हजार कोटींची तरतूद

हेदेखील वाचा- Agriculture Budget 2020 Highlights: केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये शेतक-यांसाठी करण्यात आली 15 लाख कोटींच्या कर्जाची तरतूद; पाहा कृषी क्षेत्रासाठी या बजेटमध्ये आणखी काय मिळाले ते

5) नॅशनल फॉरेन्सिक सायन्स विद्यापीठाची निर्मिती करणार

6) कौशल्य विकासासाठी 3 हजार कोटींची तरतूद

7) 99 हजार 300 कोटींची शिक्षण क्षेत्रासाठी तरतूद

8) नवीन वैद्यकिय महाविद्यालयांची निर्मिती करणार

9) सरकारी बँकांतील भरतीसाठी एकच ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार

या दृष्टीने हे शिक्षण क्षेत्रासाठी संबंधित असलेले अर्थसंकल्प विशेष असणार आहे. शिक्षण ही काळाची गरज असून जास्तीत जास्त मुला-मुलींना साक्षर बनविण्याच्या दृष्टिकोनातून ही फार महत्त्वाचे असणार आहे.