आज (31 जानेवारी) दिवशी संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आहे. दरम्यान देशात अर्थव्यवस्था सुस्तावलेल्या अंदाजात असल्याने आज सादर होणार्या आर्थिक सर्वेक्षणाकडे भारतीयांचं लक्ष लागले आहे. दरम्यान आज अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडताना 2020-21साठी देशाचा जीडीपी ग्रोथ 6 ते 6.5 असेल असा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान मागील वर्षी भारताचा जीडीपी ग्रोथ 5% होता तर त्याच्या मागील वर्षी देशाचा जीडीपी 6.8% होता. दरम्यान भारताचा आर्थिक विकास दर (India's Growth Forecast) 4.8% असेल अंदाज IMF कडून वर्तवण्यात आला आहे.
आर्थिक सर्वेक्षणानुसार, आर्थिक वर्ष 2020 च्या दुसर्या सहामाहीमध्ये देशामध्ये अर्थव्यवस्था हळूहळू पूर्ववत होण्याची शक्यता आहे. तर 2021 मध्ये देशाची आर्थिक स्थिती पुन्हा मजबूत होईल असा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान जीडीपीमध्ये घट होण्यामागील कारण सांगताना सध्या मागणी आणि गुंतवणूक यामध्ये तफावत असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे सरकारला आर्थिक तरतुदी करण्याची गरज असल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आयकरामध्ये सवलत मिळण्याची शक्यता आहे. तसेच इन्फ्रास्टक्चर सेक्टरमध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रयत्न करू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Economic Survey projects economic growth at 6% to 6.5% in 2020-21; Survey asks Government to deliver expeditiously on reforms. pic.twitter.com/QHKn9PcZ4D
— ANI (@ANI) January 31, 2020
आर्थिक सर्वेक्षण म्हणजे काय?
आर्थिक सर्वेक्षण म्हणजे दरवर्षी अर्थव्यवस्थेचा रिपोर्ट असतो. या कागदपत्रांना अर्थसंकल्पाच्या सत्रामध्ये संसदेमध्ये सादर केले जाते. यामध्ये भविष्यात बनवल्या जाणार्या योजना आणि अर्थव्यवस्थेला आव्हान देणार्या गोष्टींची माहिती दिली जाते. यासर्वेक्षणामध्ये देशाच्या आर्थिक विकासाचा अनुमान देखील जाहीर केला जातो. दरम्यान पुढील वर्षभरात देशाची अर्थव्यवस्था कमजोर होईल की भरभराटीच्या दिशेने जाईल याची माहिती दिली जाते. सर्वेक्षणाच्या आधारे सरकार आर्थिक अर्थसंकल्प जाहीर करते. दरम्यान या शिफारशींना मान्य करण्यासाठी सरकार कायदेशीररित्या बांधील नसते.
आज आर्थिक सर्वेक्षण जाहीर झाल्यानंतर उद्या ( 1 फेब्रुवारी) दिवशी अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचा अर्थसंकल्प जाहीर करणार आहेत.