
शुक्रवारी रात्री उशिरा उत्तर भारतमध्ये (North India) भूकंपाचे (Earthquake) धक्के अनुभवले गेले. रात्री 10:34 वाजता आलेल्या भूकंपामुळे दिल्ली एनसीआरसह अनेक राज्ये हादरली आहेत. या भूकंपाचा परिणाम हरियाणा, राजस्थान, जम्मू-काश्मीरमध्येही झाला. भूकंपाचे केंद्रबिंदू ताजिकिस्तान असल्याचे असे सांगितले जात आहे. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 6.1 मोजली गेली. भारत आणि ताजिकिस्तानशिवाय पाकिस्तानमध्येही तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली व्यतिरिक्त उत्तराखंड आणि आसपासच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घराबाहेर पडले. गेल्या महिन्याच्या शेवटीही दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते.
An earthquake of magnitude 6.3 on the Richter scale hit Tajikistan at 10:31pm today: National Centre for Seismology
— ANI (@ANI) February 12, 2021
शुक्रवारी दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात जोरदार भूकंपाचे धक्के बसले आहेत. मात्र, अद्याप कोठूनही कोणत्याही प्रकारच्या जीवितहानीची माहिती नाही, परंतु लोक घाबरले आहेत. शनिवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंप होताच लोक घराबाहेर पडले. गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतात वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. दिल्ली-एनसीआर व्यतिरिक्त पंजाब, हरियाणा, जम्मू-काश्मीर, हिमाचलमध्येही भूकंपाचे धक्के बसले आहेत.
याठिकाणी जाणवले भूकंपाचे धक्के -
जम्मू-काश्मीर, दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, पंजाबसह हिमाचलचे चंबा ,डलहौसी व आजूबाजूचा परिसर, ऊना, हरियाणाचे जींद आणि अंबालामध्येही धक्के जाणवले. उत्तराखंडमध्ये रुद्रप्रयागसोबत चमोलीमध्येही भूकंप जाणवला. (हेही वाचा: फटाक्यांच्या कारखान्यात लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू, 36 जखमी; मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी तीन लाख रुपये आणि गंभीर जखमींना 1 लाख रुपये देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा)
बीबीसीच्या वृत्तानुसार, सार्क डिजास्टर मॅनेजमेंट सेंटरचे संचालक प्रा. संतोष कुमार यांच्या मते कुठल्याही नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्याची भारताची क्षमता पूर्वीपेक्षा आज वाढली आहे. ,अत्र सेंटर फॉर सायंस अँड एन्व्हायरमेंटच्या अनुमिता रॉय यांचे म्हणणं आहे की दिल्लीतल्या अनेक इमारतींचे रेट्रोफिटिंग म्हणजे भूकंपविरोधी डागडुजी गरजेची आहे.