![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/08/manmohansingh-kL3E-621x414@LiveMint-2-784x441-380x214.jpg)
भारताचे माजी पंतप्रधान मनामोहन सिंग (Dr. Manmohan Singh) यांना डेंगी (Dengue)चं निदान झालं आहे. दरम्यान त्यांच्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधार होत असून ते आता धोक्याचे बाहेर असल्याचं एम्स रूग्णालयाकडून आज (16 ऑक्टोबर) जारी करण्यात आलेल्या हेल्थ बुलेटीन मध्ये म्हटलं आहे. अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनमोहन सिंग यांच्या प्लेटलेट्स वाढत असून त्यांच्या जीवाला आता धोका नाही.
डॉ. मनमोहन सिंग यांना बुधवार, (13 ऑक्टोबर) च्या रात्री दिल्लीत एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळेस त्यांना अशक्तपणा जाणवत होता तसेच ताप देखील होता. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी डॉ. सिंग यांची एम्स रूग्णालयात जाऊन भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली होती. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्वीट करत डॉ. सिंग यांना लवकर आराम मिळावा म्हणून प्रार्थना केली आहे.
डॉ. सिंग यांना अशक्तपणा जाणवायला त्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याच्या 3 दिवसांपूर्वी पासून ताप येत होता. प्रसिद्ध कार्डियोलॉजिस्ट नितिश नायक यांच्या नेतृत्त्वाखाली एक टीम मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.
एप्रिल 2021 मध्ये डॉ. मनमोहन सिंग यांना कोविड 19 ची लागण झाली होती. भारतामध्ये कोविड 19 ची दुसरी लाट धुमाकूळ घालत असताना त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एम्स मध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते.