File image of former Prime Minister Dr Manmohan Singh | (Photo Credits: PTI)

भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह (Manmohan Singh) यांनी कोरोनावर (Coronavirus) मात केल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही मनमोहन सिंह 19 एप्रिल रोजी कोरोना संक्रमित असल्याचे समोर आले होते. त्यानंतर दिल्लीच्या एम्स ट्रामा सेंटरमध्ये (AIIMS Trauma Centre) त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, मनमोहन सिंह यांनी कोरोनावर मात केल्यानंतर त्यांना 'एम्स' रुग्णालयातून आज (गुरुवारी, 29 एप्रिल) डिस्चार्ज देण्यात आला आहे. मनमोहन सिंह कोरोना संक्रमित आढळल्यानंतर उपाध्यक्ष एम. वेंकैया नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी, पक्षाचे सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा आणि इतर अनेक नेत्यांनी त्यांना त्वरित बरे होण्याची शुभेच्छा दिल्या होत्या.

मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून देशातील कोविड-19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पाच उपाययोजना सुचविल्या होत्या. त्याचबरोबर, कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी लसीकरण व औषधांचा पुरवठा वाढविणे महत्वाचे ठरेल, असाही सल्ला त्यांनी मोदींना दिला होता. हे देखील वाचा- Covid Vaccine Shortage: महत्वाची बातमी! मुंबईत पुढील 3 दिवस लसीकरण बंद राहणार, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांची माहिती

एएनआयचे ट्वीट-

मनमोहनसिंह यांना गेल्या वर्षी नव्या औषधाचे रिअॅक्शन आणि ताप आल्यानंतर एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कित्येक दिवसानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. मनमोहन सिंह हे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत आणि सध्या ते राजस्थानमधील राज्यसभेचे सदस्य आहेत. 2004 ते 2014 पर्यंत ते देशाचे पंतप्रधान राहिले आहेत. त्यांच्यावर 2009 साली एम्समध्ये कोरोनरी बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.