माजी पंतप्रधान मनमोहन सिंह (Manmohan Singh) यांना ताप आणि अशक्तपणा असल्यामुळे दिल्लीच्या एम्स (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यावर्षी एप्रिलमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान मनमोहन सिंह यांना कोविड-19 ची लागण झाली होती. त्यावेळीही त्यांना एम्समध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथून काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. तर मागील वर्षीही मनमोहन सिंग यांना औषधांचे रिअॅक्शन आणि तापामुळे एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर अनेक दिवसांच्या उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. 2009 मध्ये एम्समध्येच त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
पहा ट्विट:
Former Prime Minister Dr. Manmohan Singh admitted to All India Institute of Medical Sciences, Delhi
(file photo) pic.twitter.com/SAm5NOpeiF
— ANI (@ANI) October 13, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)