coronavirus. (Photo Credit: PTI)

भारतामध्ये कोरोना वायरसची तिसरी लाट (Coronavirus Third Wave) येत्या काही महिन्यां मध्ये अपेक्षित आहे. दरम्यान यामध्ये लहान मुलांसाठी विशेष दक्षता घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवरच आज केंद्र सरकार कडून लहान मुलांना कोविड 19 संकटात सांभाळताना विशेष काळजी घेण्याचं आवाहन करताना काही नियमांबदल बदल करत नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. यामध्ये स्टेरोईडचा वापर, रेमडीसीवीरचा वापर ते अगदी मास्क कोणी, कसा घालावा याबाबतही माहिती देण्यात आली आहे. दरम्यान घरातील लहान मुलं देखील कोविड 19 संकटात सुरक्षित ठेवण्याची मोठी जबाबदारी त्यांचे पालक आणि आरोग्य यंत्रणेवर आहे. COVID19 Third Wave: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविरोधात लढण्यासाठी तयार, मुंबई लोकलबद्दल आदित्य ठाकरे यांनी केले 'हे' विधान.

दरम्यान DGHS ने आज जारी केलेल्या नव्या नियमावलीमध्ये 5 वर्षांखालील मुलांना मास्क नको असं म्हटलं आहे. तर वय वर्ष 6-11 यांनी पालक आणि डॉक्टरांच्या निगराणीखाली मास्कचा वापर करावा असं म्हटलं आहे. तसेच 18 वर्षां खालील मुलांना अ‍ॅन्टिवायरल ड्रग रेमडीसीवीर टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याऐवजी परिस्थिती पाहून HRCT imaging यांचा योग्य वापर करून कोविडचं निदान करण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.

कोविड 19 च्या असिम्टेमेटिक आणि सौम्य लक्षणं असणार्‍या मुलांना स्टेरॉइईड्स न देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ज्या मुलांना स्टेरॉईड दिली जातील ती योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात दिली जावीत असे देखील सूचित करण्यात आले आहे. सोबतच कटाक्षाने स्वतःहून सेल्फ़ मेडिकेशन म्हणून स्टेरॉईडचा वापर देखील टाळा असे सूचवण्यात आले आहे.

HRCT स्कॅन स्कोअर देखील उपचार पद्धतीसाठी नसावा. उपचार हे पूर्णपणे लक्षणांची तीव्रता पाहून ठरवण्यासाठी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान भारतामध्ये अद्याप 18 वर्षांखालील कोणत्याही वयोगटासाठी कोविड 19 लसीकरण मंजूर करण्यात आलेले नाही. सध्या कोवॅक्सिन कडून याबाबतची चाचपणी सुरू आहे. सध्या त्याच्या क्लिनिकल ट्रायल्स सुरू असून लवकरच त्याला देखील हिरवा कंदील देण्याचा प्रयत्न आहे.