Eco Friendly Diwali 2018: 'भाजीफटाके' विकून सर्वोच्च न्यायालयाच्या फटाक्यांवरील बंदीला दिल्लीतील विक्रेत्यांचा विरोध
(Photo Credits: Twitter/ani)

फटाके फोडण्यावर बंदी घालणारा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्यावर यंदाची दिवाळी काहीशी आवाज न करताच जाणार, असा अनेकांचा कयास होता. त्यातच जर फटाके फोटायचेच असतील तर, रात्री 8 ते 10 या वेळेतच फोडा. त्यातही हे फटाके फोडताना ग्रिन फटाकांनाच प्राधान्य द्या, असेही निर्देश न्यायालयाने दिले. पण, मजेशीर असे की, हे ग्रीन फटाके म्हणजे नेमके काय? हे राजधानी दिल्लीतील अनेक फटाका व्यवसायिक आणि विक्रेत्यांना निटसे उमगलेच नाही. त्यामुळे फटाका विक्रेता हरजितसिंह छाब्रा यांनी एक नवाच फटाक तयार केला. या फटाक्याची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. तसेच, ग्रीन फटाका म्हणून या फटाक्याचा उल्लेख केला जात आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने फटाके बंदीवर घातलेल्या निर्णायाचा विरोध करण्यासाठी अशा प्रकारे फटाके विकल्याचेही सांगितले जात आहे.

जर तुम्ही छाब्रा महोदयांच्या दिल्ली येथील सदर बाजार परिसरातील दुकानात जाल तर तुम्हाला या फटाक्याचे दर्शन होईल. येथे तुम्हाला भेंडी फटाका, बटाटा बॉम्ब, चवळी फटाका, कांदा फटाका, शिमला मिरची फटाका, ढबू मिरची फटाका, अनार आणि फुलबाजाही मिळेल. पण, जेव्हा तुम्ही हे फटाके निट पाहाल तर, तुम्हाला धक्का बसल्यावाचून राहणार नाही. (हेही वाचा, केंद्र सरकारने तयार केले पर्यावरणपूरक फटाके; पारंपरिक फटाक्यांपेक्षा स्वस्त, प्रदूषणाला बसेल आळा)

काय आहे प्रकार?

छाब्रा महोदयांनी ग्रिन फटाका याचा अर्थ काहिसा स्वत:च्या सोईनुसारच लावला आहे. हे महोदय सांगतात की, आम्ही हिरव्या फळभाज्या आणि पालेबाज्यांनाच फटाक्यांचा आकार दिला आहे. जेनेकरुन नागरिकांना प्रदुषणाचे दुष्परीणाम कळतली. तसेच, फटाके फोडल्यामुळे होणाऱ्या प्रदुषणालाही काहीसा आळा बसेल. छाब्रा महोदयांच्या दुकानात भाजी खरेदीसाठी येणारे ग्राहकही छब्रांची प्रतिभाशक्ती पाहून आश्चर्यचकित होताना दिसत आहेत.