Keshav Puram Factory Fire | (Photo Credit- X/ANI)

दिल्लीच्या केशवपूरम (Keshav Puram Factory Fire) भागातील लॉरेन्स रोडवर (Lawrence Road Fire) सोमवारी सकाळी एचडीएफसी बँक (HDFC Bank) नजिक एका कारखान्यात भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, नागरिकांमध्ये घबराट पसरली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी तत्काळ दाखल झाल्या. दिल्ली अग्निशमन विभागाचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यामध्ये आकाशात काळ्या धुराचे प्रचंड लोट पसरलेले दिसत आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली आहे.

अधिक तपशीलांची प्रतीक्षा

दिल्ली अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केशवपूरममधील लॉरेन्स रोडवर असलेल्या एचडीएफसी बँकेजवळ एका कारखान्यात आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे 14 बंब पाचारण करण्यात आले आहेत. अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्या आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान, सध्या तरी कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. आगीचं नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे. (हेही वाचा, Delhi Fire Video: दिल्लीतील कॅनॉट प्लेसमधील मिस्ट्री रूमला आग, आत अडकलेल्या एका व्यक्तीला अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवले)

दरम्यान, या घटनेच्या एक दिवस आधी रविवारी संध्याकाळी, दिल्लीतील मांडी गावाजवळील कचरा डेपोमध्ये देखील आग लागली होती. अग्निशमन दलाने तातडीने कारवाई करून आग नियंत्रणात आणली. त्याच दिवशी बिहारमधील बक्सर जिल्ह्यात, पटना-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर नवा भोजपूर गावाजवळ एका ट्रकमध्ये आग लागल्याचीही घटना घडली होती. स्थानिक नागरिकांनी माहिती दिल्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आणि आग विझवण्यात यश आलं. या घटनेतही कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.

आग लागल्यास तातडीने काय कराल?

अग्निसुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रसंगावधान आणि संभाव्य धोका विचारात घेऊन आगोदरच काही बाबींचे पालन केल्यास मोठा आनर्थ टळू शकतो. येथे काही मूलभूत अग्निसुरक्षा आणि बचाव पावले देत आहेत:

मूलभूत अग्निसुरक्षा उपाय

स्मोक अलार्म बसवा आणि ठेवा - ते महत्त्वाच्या ठिकाणी ठेवा आणि नियमितपणे तपासा.

अग्निशामक यंत्र ठेवा - ते कसे वापरायचे ते शिका आणि ते कसे प्रवेशयोग्य ठेवा.

सुटकेचा मार्ग आखा - तुमच्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी प्रत्येकाला ते माहित आहे याची खात्री करा.

जास्त लोडिंग इलेक्ट्रिकल आउटलेट टाळा - आग लावू शकणारे शॉर्ट सर्किट टाळा.

ज्वलनशील वस्तू योग्यरित्या साठवा - त्यांना उष्णतेच्या स्रोतांपासून दूर ठेवा.

कधीही उघड्या ज्वाला अनाठायी ठेवू नका - मेणबत्त्या, स्टोव्ह किंवा जळत्या साहित्यावर नेहमीच लक्ष ठेवले पाहिजे.

दरम्यान, शांत राहा आणि आपत्कालीन सेवांना सतर्क करा - अग्निशमन विभागाला ताबडतोब कॉल करा. सर्वात सुरक्षित मार्ग वापरून बाहेर पडा - लिफ्ट/लिफ्ट टाळा आणि धुरापासून वाचण्यासाठी कमी उंचीवर रहा. तुमचे नाक आणि तोंड झाकून ठेवा - अधिक सुरक्षितपणे श्वास घेण्यासाठी ओल्या कापडाचा वापर करा. सुरक्षित असल्यास इतरांना बाहेर पडण्यास मदत करा - मुले, वृद्ध आणि हालचाल समस्या असलेल्या व्यक्तींना मदत करा.