सोन्याच्या दरात शुक्रवारी जबरदस्त घसरण झाली असून राजधानी दिल्लीत सोन्याचे दर 222 रुपयांनी खाली आले आहेत. यामुळे सोने प्रति 10 ग्रॅम 43,358 रुपये झाले आहे. एचडीएफसी सिक्युरिटीज यांच्यानुसार, जागतिक बाजारात घसरण होत चालल्याने त्याचा सोन्याच्या किंमतीवर परिणाम झाला आहे. दरम्यान गुरुवारी सोन्याचे दर 43,580 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले होते. सोन्यासोबत चांदीचे भाव सुद्धा कमी झाले आहेत. चांदीच्या दरात 60 रुपयांनी घसरण झाली असून 48,130 रुपयांवर पोहचले आहेत. दरम्यान चांदी 48,190 रुपये दर गुरुवारी होते.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांच्यानुसार, दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचे दर शुक्रवारी 222 रुपयांनी कमी झाले आहेत. पटेल यांनी असे सांगितले की, सोन्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर दर कमी झाल्याने घरगुती बाजारात ही त्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. भारतीय रुपयाबाबत बोलायचे झाल्यास शुक्रवारी घसरण झाली आहे. रुपयात डॉलरच्या तुलनेत 50 पैशांनी घसरण झाली. सोन्याच्या किंमतीतील घसरणीमुळे गुंतवणूकदार बॉन्ड्ससारख्या अधिक सुरक्षित गुंतवणूकीकडे वळत आहेत.तसेच आंतरराष्ट्रीय किमतींवरही शुक्रवारी सोने-चांदीची घसरण झाली. सोन्याचा भाव प्रति औंस 1,632 डॉलर आणि चांदीचा भाव 17.35 डॉलर प्रति औंस होता.(Gold Shopping: सोने खरेदी करत असाल तर हा नवा नियम नक्की वाचा; बनावट सोने ओळखणे आता होणार सोपे)
सर्वसाधारणपणे पाहायचे तर कोणतीही वस्तू स्वस्तात उपलब्ध असते तेव्हा लोक ती मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. परंतू, सराफा बाजारात काहीसे या उलट पाहायला मिळते. सर्वसामान्य बाजारपेठेचा नियम इथे लागू पडत नाही. इथे सोनं महाग होणार अशी शक्यता दिसली की लोक खरेदीसाठी अधिक घाई करतात. मात्र, अतीमहागाईचा नाही म्हटले तरी सराफाबाजारातील व्यवहारावर परीणाम झालेला पाहायला मिळते.