Gold Recycling | Image For Representation (Photo Credits: Pixabay)

नवं वर्ष सुरु होऊन आज दुसरा दिवस उलटला आहे. याच पार्श्वभुमीवर सोने-चांदीच्या दरात मोठा बदल झाला आहे. त्यानुसार 2 जानेवारीला सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. गुरुवारी दिल्ली सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 38 रुपयांनी वाढला आहे. सोन्यासारखेच चांदीचे दर ही वाढले आहेत. एक किलोग्रॅम चांदी 21 रुपयांनी महागली आहे. एचडीएफसी सिक्युरिटीझ यांच्या मते, रुपयांत घसरण झाल्याने सोन्या-चांदीच्या किंमती वाढल्या आहेत.

गुरुवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे दर 39,854 रुपयांनी वाढून 39,882 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. तर वर्षाच्या सुरुवातीला सोन्याचे दर घसरल्याचे दिसून आले होते. दिल्ली सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचे दर 131 रुपयांनी घटले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर न्युयॉर्क येथे सोने 1250 डॉलर प्रति औंस आणि चांदी 17.85 डॉलर प्रति औंस झाले आहेत. सोन्याप्रमाणेच चांदीचे दरात वाढ झाली आहे. एक किलोग्रॅम चांदीचे दर 47,760 रुपयांवरुन 47,781 रुपये झाले आहेत. बुधावारी चांदी 590 रुपये प्रति किलोग्रॅम वर पोहचली होती. तपन पटेल यांनी असे सांगितले की, रुपयात घसरण झाल्याने दिल्लीतील 24 कॅरेट सोन्याचे दर 38 रुपयांनी वाढले. मात्र सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी 2019 चे वर्ष हे उत्तम राहिले आहे.

तर भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) ही देशातील एकमेव एजन्सी आहे ज्यांना सोन्याचे दागिने हॉलमार्किंगला मान्यता आहे. आता नव्या नियमानुसार 14 कॅरेट, 18 कॅरेट आणि 22 कॅरेट असं सोन्यासाठी हॉलमार्किंग निश्चित करण्यात आलं आहे. सध्या आपल्या देशात ग्राहकांच्या इच्छेनुसार हॉलमार्क दागिणे दिले जातात. परंतु नवा नियम लागू झाल्यानंतर सराफांना हॉलमार्क असलेले दागिने विकणेच बंधनकारक असेल. यामुळे दागिण्यांच्या बनावट दागिने विकून ग्राहकांची फसवणूक थांबणार आहे व ग्राहकांना यांचा फायदा होणार आहे