Arvind Kejriwal ED Summons: अरविंद केजरीवाल यांना ईडीचे पुन्हा समन्स, हजर न झाल्यास होणार कारवाई
(Photo Credit - Arvind Kejriwal)

दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने अरविंद केजरीवाल यांना पुन्हा एक समन्स पाठवले आहे. दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अरविंद केजरीवाल यांना सहावे समन्स बजावले आहे. ईडीने केजरीवाल यांना 19 फेब्रुवारीला चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. असं असलं तरी अरविंद केजरीवाल यांनी आतापर्यंत ईडीने बजावलेल्या सर्व समन्सकडे दुर्लक्ष करत आहेत. याबाबत नुकतीच ईडीने न्यायालयात धाव घेतली होती.  (हेही वाचा -ED Summoned Arvind Kejriwal: दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना चौथ्यांदा समन्स; 18 जानेवारीला होणार चौकशी)

पाहा पोस्ट -

केजरीवाल यांना याआधी पाच समन्स पाठवण्यात आल्याचे ईडीने म्हटले आहे. मात्र अद्यापपर्यंत त्यांनी या समन्सला कोणतेही योग्य उत्तर दिलेले नाही. केजरीवाल अद्याप चौकशीसाठी हजर झालेले नाहीत. 7 फेब्रुवारीला ईडीने या प्रकरणी राऊस एव्हेन्यू न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायालयाने सुनावणी केली. तसेच अरविंद केजरीवाल यांना हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

केजरीवाल यांना या वर्षी 2 फेब्रुवारी, 18 जानेवारी आणि 3 जानेवारी आणि 2023 मध्ये 21 डिसेंबर आणि 2 नोव्हेंबर या तारखांना बोलावण्यात आले होते. मात्र त्यांनी नियोजित दौऱ्यांचं कारण देत ईडी चौकशीला सामोरी जाण्यास टाळले. मात्र यावेळी ते हजर न झाल्यास त्यांच्यावर कारवाई होणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.