Arvind Kejriwal (File Image)

ED Summoned Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांच्या अडचणी वाढू शकतात. दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने अरविंद केजरीवाल यांना चौथ्यांदा समन्स (Summons) पाठवले आहे. ईडीने समन्स जारी केले असून केजरीवाल यांना 18 जानेवारीला चौकशीसाठी ईडी (ED) कार्यालयात बोलावले आहे. याआधी ईडीने अरविंद केजरीवाल यांना तीन वेळा समन्स बजावले होते. मात्र, तीनही वेळा केजरीवाल ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले नाहीत. ईडीने प्रथमच समन्स जारी केल्यावर केजरीवाल यांनी मी निवडणूक प्रचारासाठी मध्य प्रदेशात जात असल्याचे उत्तर दिले.

ईडीच्या नव्या समन्सनंतर आम आदमी पार्टीने आरोप केला आहे की, ईडी सीएम केजरीवाल यांना अटक करू इच्छित आहे. ही चौकशी केवळ निमित्त आहे, ईडीला आमच्या नेत्याला अटक करायची आहे, असे पक्षाने म्हटले आहे. ईडीला हवे असल्यास ते आपले प्रश्न लेखी देऊ शकतात. दिल्ली दारू घोटाळ्यात ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 3 समन्स बजावले असून आता चौथ्यांदा समन्स बजावण्यात आले आहे. यापूर्वी तीनवेळा समन्स बजावूनही केजरीवाल ईडीसमोर हजर झाले नाहीत. आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांनी गोव्याच्या निवडणुकीत ३३८ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप ईडीने केला आहे. (हेही वाचा - Arvind Kejriwal: तुरुंगात असलो तरी दिल्लीत आम आदमी पार्टी जिंकेल; अरविंद केजरीवालांचा विश्वास)

या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ईडीला आम आदमी पक्षाच्या नेतृत्वाला प्रश्न विचारण्यास सांगितले आहे. केजरीवाल यांनी नुकतेच ईडीला पत्र लिहून ईडीचे वर्तन मनमानी आणि अपारदर्शक असल्याचे म्हटले होते. समन्स पाठवण्याचे कारण काय, असा सवाल केजरीवाल यांनी केला आहे. यासोबतच समन्स पाठवण्याचा उद्देश तपास किंवा माझ्या प्रतिष्ठेला कलंक लावणे हा असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे.