केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) दिलेल्या माहितीनुसर, दिल्लीतील हवेची गुणवत्ता सलग सहाव्या दिवशी 'अत्यंत खराब' श्रेणीत आहे. आज (गुरुवार, 29 नोव्हेंबर) सकाळी 7 वाजेपर्यंत हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 332 नोंदवला गेला आहे. किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने हिवाळ्यातील थंडीसह धुराच्या दाट थराने शहर व्यापून गेले आहे. पाठिमागील काही दिवसांपासून राजधानी दिल्लीचा श्वास कोंडला आहे. वायुप्रदूषण इतक्या अत्युच्च टोकाला गेले आहे की, हवेची गुणवत्ता दररोज 'खराब ते अत्यंत खराब' श्रेणीतच पाहायला मिळत आहे. ज्यामुळे नागरिकांना श्वसनविकार आणि त्वचाविराकांना तोंड द्यावे लागत आहे.
सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये दिल्लीचा समवाेश
हवा गुणवत्तेत अगदीच किंचित सुधारणा आहे. मात्र, असे असले तरी भारतातील सर्वाधिक प्रदुषित शहरांमध्ये दिल्ली अव्वल आहे. सीपीसीबीच्या दैनिक बुलेटिननुसार, गुरुवारी (29 नोव्हेंबर) 325 च्या एक्यूआयसह दिल्ली हे भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर ठरले. (हेही वाचा, Weather Forecast Today, November 29: मुंबई, दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद आणि कोलकातामध्ये कसे असेल आजचे हवामान, जाणून घ्या, आजचे हवामान)
भारतातील प्रमुख प्रदुषित शहरे
बिहार राज्यातील शरीफ (एक्यूआयः 348) या यादीत अव्वल स्थानावर आहे.
हरियाणा राज्यातील सिरसा (एक्यूआयः 342) हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक प्रदूषित शहर आहे.
दिल्ली शहरातील हवमान
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) पुढील पाच दिवसांत दिल्लीचे तापमान 10 डिग्री सेल्सियस ते 27 डिग्री सेल्सियस दरम्यान राहील असा अंदाज वर्तवला आहे. मध्यम ते उथळ धुके देखील अपेक्षित आहे, जे उत्तर भारतावर हिवाळा आपली पकड घट्ट करत असल्याने पुढील काही दिवस वतावरण थंड राहण्याचे संकेत देतात.
या वर्षातील सर्वात थंड रात्र
दिल्ली शहरासाठी गुरुवारची रात्र या हंगामातील आतापर्यंतची सर्वात थंड होती. जिचे तापमान 10.1 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले.
- दुसरी सर्वात थंड रात्रः 21 नोव्हेंबर (10.2 °C)
- तिसरी सर्वात थंड रात्रः 27 नोव्हेंबर (10.4 °से)
हवा गुणवत्ता निर्देशांकही घसरला
#WATCH | Air quality in the 'Very Poor' category in the national capital of Delhi today
Visuals from Kalindi Kunj pic.twitter.com/YBxuGbVZTs
— ANI (@ANI) November 29, 2024
हवेच्या गुणवत्तेचा कल
दिल्लीच्या एक्यूआयमध्ये गेल्या आठवड्यात चढ-उतार दिसून आलेः
नोव्हेंबर 20: 419 (Severe)
नोव्हेंबर 21: 371 (Very Poor)
22 नोव्हेंबरः 393 (Very Poor)
23 नोव्हेंबरः 412 (Severe)
24 नोव्हेंबरः 318 (Very Poor)
लक्ष्मी ग्रॅपच्या अंमलबजावणीवर सर्वोच्च न्यायालयाची टीका
ग्रेडेड रिस्पॉन्स एक्शन प्लॅन (जीआरएपी) निर्बंधांची अप्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिल्ली-एनसीआरमधील अधिकाऱ्यांवर टीका केली. प्रदूषणाची पातळी सुधारली नाही तर कठोर उपाययोजना करण्याचा इशारा देत न्यायालयाने जीआरएपी-4 निर्बंध सोमवार, 2 डिसेंबरपर्यंत वाढवले आहेत.
दरम्यान, राजधानी दिल्लीतील प्रदुषणाबाबत एका याचिकेवर सुनावणी घेतालान, न्यायालयाने संध्याकाळी 4 वाजेनंतर पेंढा जाळण्याच्या घटनांची नोंद घेतली. हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने (CAQM) दिलेल्या परवानगीनुसार संस्था संकरीत पद्धतीने काम सुरू ठेवू शकतात असे सांगितले. दरम्यान, न्यायालय वर्षभरात फटाके फोडण्यावर बंदी घालण्याचा विचार करत असून सोमवारी निर्णय अपेक्षित आहे. दिल्ली सततच्या प्रदूषणाचा आणि घटत्या तापमानाचा सामना करत असताना, अधिकारी रहिवाशांना सावधगिरी बाळगण्याचे आणि सर्वाधिक प्रदूषणाच्या वेळी बाह्य कृती (फटाके, लॉग्न ड्राईव, वस्तू जाळून धूर करणे आदि.) मर्यादित करण्याचे आवाहन करतात.