मुंबई (Mumbai) येथे नौदलाच्या (Indian Navy) विमानवाहू नौका दुरूस्त करण्यासाठी समुद्रातील सर्वात मोठा ‘ड्राय डॉक’ (Dry Dock) उभारण्यात आला असून आज, (28 सप्टेंबर) शनिवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्या हस्ते या तळाचे उदघाटन करण्यात आले. हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीने हे काम केले असून समुद्रातील पाण्यावर तब्बल 5.68 कोटी घन मीटरचे हे बांधकाम करण्यात आलं आहे. हा तळ 281 मीटर लांब, 45 मीटर रुंद व 17 मीटर खोल असून यासाठी तब्बल 9 वर्षांचा कालावधी लागला आहे.‘आयएनएस विक्रमादित्य’ ही विमानवाहू नौका देखील दुरुस्त करण्याची या डॉकची क्षमता असणार आहे. या तालाच्या उभारणीत जवळपास 1000 कोटींहून अधिक खर्च आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, या दुरुस्ती तळाचे वैशिष्ट्य म्हणजे या मध्य नौदलाच्या जहाजांचे पूर्णतः दुरुस्ती शक्य होणार आहे, म्हणजेच जहाजाचे जे भाग सदैव पाण्याखाली असतात त्यांचाखली ब्लॉक लावून ते पाण्याबाहेर काढले जातील व मग त्यांची दुरुस्ती होईल अशी सोय आहे. जमिनीवरील जागा वाचवून त्याऐवजी समुद्राचा वापर करून बनवण्यात आलेली ही यंत्रणा आश्वासक असल्याचे सांगितले जात आहे.सर्वात अत्याधुनिक पाणबुडी INS Khanderi नौदलात सामील; पाहा काय आहेत वैशिष्ट?
राजनाथ सिंग ट्विट
An additional Dry Dock facility was inaugurated at the Naval Dockyard in Mumbai. This asset is an edifice of modern India. pic.twitter.com/nJvgQUvxqS
— Rajnath Singh (@rajnathsingh) September 28, 2019
भारतीय नौदलाच्या पश्चिम कमांडच्या मुख्यालयात हा ड्राय डॉक उभारण्यात आला आहे. या तळाच्या उभारणीसाठी समुद्राच्या तळाशी विशिष्ट प्रकारचे सिमेंट टाकण्यात आले असून दोन्ही बाजूंनीही सिमेंटच्या ठोकळ्यांची भिंत उभारण्यात आली आहे.दुरूस्तीसाठी आवश्यक असलेली यंत्रणा, पाणी काढण्यासाठी मोठे पंपही लावण्यात आले आहेत, सोबतच आगीसारख्या दुर्घटनेसाठी तालाच्या भिंतीत अग्निशमन यंत्रणा उभारण्यात आली आहे.