Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

COVID19 4th Wave: भारतात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा घटताना दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोजच्या रुग्णांचा आकडा कमी होत 10 हजारांच्या खाली पोहचला आहे. दरम्यान अद्याप कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा प्रति दिनी 100 च्या पार जात आहे. कोरोनाचा घटती आकडेवारी पाहता काही तज्ञांनी कोविड19 चे संकट लवकरच संपुष्टात येणार असल्याचा अंदाज लावला आहे. तर काहींनी गणितीय मॉडेलच्या आधारावर पुन्हा कोरोनाची चौथी लाट (COVID19 4th Wave) येणार असल्याचे म्हटले आहे. काहींचे असे म्हणणे आहे की, विदेशात कोरोनाची चौथी आणि पाचवी लाट आली आहे. अशातच येथे सुद्धा कोरोनाच्या पुढील लाटा उशिराने का होईना पण जरुर येतील. दरम्यान याच दरम्यान इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चचे वैज्ञानिक यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

आयसीएमआर, जोधपूर स्थिती एनआयआयआरएनसीडीचे निर्देशक आणि कम्युनिटी मेडिसिन विशेतज्ञ डॉ. अरुण शर्मा यांनी असे म्हटले की, भारतात कोरोनाच्या तीन लाटा आल्या आहेत. आता लोकांना पुढील लाटेबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे. परंतु गेल्या दोन वर्षात कोरोनाचे रुप बदलताना दिसून आले आहे. तसेच ज्या प्रकारे नवेनवे वेरियंट आले आहेत त्यानुसार कोरोना संदर्भात ठोस भविष्यवाणी करणे कठीण आहे.(COVID 19 In India: भारतामध्ये कोरोनारूग्णांमध्ये घट कायम; मागील 24 तासांत 6,561 नवे रूग्ण)

डॉ. अरुण यांनी असे म्हटले की, सध्या कोरोनाचे नवा म्युटेशन समोर आलेला नाही. ओमिक्रॉननंतर कोणताही नवा वेरियंट आलेला नाही. या व्यतिरिक्त प्रति इम्युनिटीसाठी भारतात जवळजवळ 80 टक्के लोकांचे पूर्णपणे लसीकरण झालेले आहे. तर जोपर्यंत कोविडचा कोणताही नवा वेरियंट येत नाही तो पर्यंत कोणतीही मोठी लाट येण्याची शक्यता नाही आहे. त्याचसोबत फक्त या आधारावर सांगायचे आहे की, विदेशात कोरोनाची चौथी आणि पाचवी लाट आली आहे, तर भारतात उशिराने का होईना पण येईल. हे चुकीचे होईल कारण विदेशात जी अखेरची लाट आली त्यामुळेच ओमिक्रॉन वेरियंट आला होता. भारतातील तिसऱ्या लाटेवेळी हा वेरियंट अधिक प्रभावी होता. याच कारणास्तव भारतात लाखोच्या संख्येने रुग्ण आढळून येत होते. त्यानंतर कोणताही नवा वेरियंट न आल्याने पुढील लाट येण्याची शक्यता नाही.

तसेच डॉ. शर्मा असे म्हणतात की, कोरोना महारोग असा आहे जो नियमित आपले रुप बदलत आला आहे. त्यामुळे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. कोरोना पुन्हा येणार नाही पण अशी अपेक्षा आहे की, आता जर कोणती लाट आल्यास   याआधी आल्या होत्या त्याच्या तुलनेत ती धोकादायक नसेल. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सुद्धा दिसून आले की, ओमिक्रॉनच्या वेरियंटमध्ये मोठ्या संख्येने लोक संक्रमित झाले होते. पण त्यात मृत्यू दरात कोणताही खास परिणाम झाला नाही. या व्यतिरिक्त गंभीर स्थितीत रुग्णालयात भर्ती होणाऱ्यांचा आकडा सुद्धा कमी होता. हा वेरियंट फक्त लोकांना संक्रमित करुन निघून गेला.