Corona Mutation | Representative Image (Photo Credits: Pixabay)

जागतिक आरोग्य संघटना (World Health Organization) द्वारा कोरोना व्हायरस व्हेरीएट्स (CoronaVirus Variant) अथवा स्ट्रेनचे नामकरण करण्यात आले आहे. यात जगभरातील विविध देशांमध्ये आढललेल्या कोविड वेरीएन्ट (Covid Variant) समावेश आहे. विविध देशांनी एकमेकांवर कोरोना स्ट्रेनवरुन केलेल्या आरोप प्रत्यारोपानंतर डब्ल्यूएचओने (WHO) हे नामकरण केले आहे. डब्ल्यूएचओने भारतातील आढळलेल्या कोरोना व्हेरीएटन्टचेही नामकरण केले आहे. भारतात पहिल्यांदा आढळलेल्या व्हेरीएंटचेही नामकरण करण्यात आले आहे. WHO ने भारतात आढळलेल्या B.1.617 वेरीएंटला डेल्टा वैरिएंट (Delta Variant) म्हटले आहे. हा वेरीएंट आतापर्यंत 53 देशांमध्ये सापडला आहे. तर आणखी 7 देशांमध्ये हा व्हेरीएंट सापडला आहे. मात्र त्याची अधिकृपणे ओळख पटवण्यात आली नाही.

जागतिक आरोग्य संघटनेने सोमावारी (31 मे) म्हटले की भारतात 12 मे रोजी या व्हेरीएंटबाबत प्रथम माहिती पुढे आळी. जेव्हा कोरनाच्या B.1.617 स्ट्रेनला भारतीय व्हेरीएन्ट म्हटले गेले. तेव्हा स्वत: जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले की, कोरोनाचा कोणताही व्हेरीएन्ट कोणत्याही देशाच्या नावाने ओळकला जाऊ नये. सध्यास्थिती B.1.617 variant 53 जवळपास 53 देशांमध्ये सापडला आहे. आणखीही सात देशांमध्ये तो सापडला आहे मात्र, त्याची अधिकृत पुष्टी करण्याच काम सुरु आहे. संक्रमणाच्या वेगासाठी हा अत्यंत घातक असा हा व्हेरीएन्ट समजला जातो. जगभरातील संशोधक याची संक्रमक क्षमता शोधत आहेत. (हेही वाचा, Mumbai Lockdown Guidelines: 1 जून पासून मुंबईकरांसाठी लॉकडाउन संदर्भातील नव्या गाइडलाइन्स जाहीर, पहा काय असणार नियम)

जागतिक आरोग्य संघटनेच्या कोविड 19 टेक्निकल लीड डॉ. यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, कोरोनाच्या कोणत्याही स्ट्रेनला कोणत्याही देशाच्या नावे संबोधले जाऊ नये. कारण कोणत्याही व्हेरीएंटला दिली जाणारी नावे ही पूर्णपणे वैद्यकीय शोधांवर आधारीत असतात. त्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही स्ट्रेनला संबंधित देशास जबाबदार धरु नये. तसेच देशाच्या नावाने संबोधू नये. कोरोना वायरस (SARS-CoV-2) चे वैज्ञानिक नाव आणि शोध पहिल्यापासूनच सुरु होता. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका टीमने विविध देशांच्या विविध आधारांवरुन ठेवल्या जाणाऱ्या नावांच्या वादास दूर ठेवण्यासाठी ग्रीक अल्फाबेट म्हणजेच अल्फा बीटा गामा (Alpha, Beta, Gamma) आणि इतर आधारांवर नावे ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.