Representational Image (Photo Credits: IANS)

Mumbai Lockdown Guidelines: राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या आकडेवारीत घट होत चालली आहे. तसेच मुंबईत सुद्धा कोरोनाच्या रुग्णांचा आकडा कमी होताना दिसून येत आहे. तर नुकत्याच काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेसोबत फेबसबूक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधला. पण त्यावेळी त्यांनी राज्यात लॉकडाउन 15 जून पर्यंत जरी वाढवला जाणार असल्याचे स्पष्ट केले. अशातच आता मुंबई महापालिकेकडून उद्यापासून (1 जून) लॉकडाउन संबंधित नव्या गाइडलाइन्स जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र त्यासाठी काही नियमांचे सुद्धा नागरिकांना पालन करावे लागणार आहे.

मुंबईत 1 जून पासून काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी असणार आहे. मात्र नेमक्या कोणत्या गोष्टी सुरु राहणार किंवा बंद राहणार याबद्दल महापालिकेचे आयुक्त एक्बाल चहल यांनी एक परिपत्रक काढून त्यात त्यांनी स्पष्ट केले आहे. तर जाणून घ्या मुंबईतील नव्या गाइडलाइन्स बद्दल अधिक.(परदेशी शिक्षणासाठी जाणा-या विद्यार्थ्यांच्या दोन कोविड डोसमधील कालावधी कमी करा, BMC चे केंद्राला पत्र)

- अत्यावश्यक दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहतील.

- सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पुढील व्यवस्थेप्रमाणे उघडी राहतील.

-पहिल्या आठवड्यात रस्त्याच्या उजव्या बाजूकडील दुकाने सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सुरु ठेवण्यास परवानगी असणार आहे. तर डाव्या बाजूची दुकाने मंगळवार, गुरुवारी सुरु राहतील.

-त्यानंतरच्या पुढील आठवड्यात रस्त्याच्या डाव्या बाजूकडील दुकाने सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सुरु राहतील. तर उजवीकडील दुकाने मंगळवार, गुरुवारी सुरु ठेवली जातील.

-अशाच पद्धतीने दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे.

-शनिवारी आणि रविवारी आवश्यकतेनुसार दुकाने पूर्णपणे बंद राहतील.

-ई-कॉमरस अंतर्गत वस्तूंसोबत आवश्यकतेनुसार वस्तूंचे वितरण करण्यास परवानगी असणार आहे.

-राज्य शासनाच्या ब्रेक द चेन संदर्भातील आदेश अस्तीत्वात असेपर्यंत हे आदेश लागू राहतील.

-सर्व व्यापारी आस्थापनांना सोशल डिस्टंन्सिंगसह मास्कचा वापर आणि अन्य उपाययोजना करणे अनिवार्य असणार आहे.

>>COVID19 नव्या गाइडलाइन्स:- 

                          Mumbai New COVID19 Guidelines (Photo Credits-BMC)                           Mumbai New COVID19 Guidelines (Photo Credits-BMC)

(हेही वाचा-Pune Lockdown: पुणे येथे लॉकडाउनचे नियम शिथिल; 'या' नियमांचे पालन करण्यासह पहा काय सुरु, काय बंद राहणार)

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 15,077 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात 184 जणांचा बळी गेला आहे. तसेच 33 हजार रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला असून राज्यात एकूण 57,46,892 रुग आहेत. तर 2,53,367 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.