Lockdown | File Image | (Photo Credits: PTI)

Pune Lockdown:  राज्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा सध्या गेल्या काही दिवसांपासून कमी होताना दिसून येत आहे. तसेच ग्रामीण भागातील काही जिल्ह्यांनी सुद्धा कोरोनावर मात केली आहे. परंतु काही ठिकाणी अद्याप कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळेच येत्या 15 जून पर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. परंतु या लॉकडाउन दरम्यान काही नियम सुद्धा शिथिल करण्यात आले आहेत. या संदर्भातील सविस्तर नियमावली 1 जूनला अधिकृतपणे जाहीर केली जाणार आहे. परंतु पुण्यात लॉकडाउनचे काही नियम शिथिल जरी केले तरीही काही नियमांचे पालन करावे लागणार आहे.

पुण्यात उद्यापासून सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी असणार आहे. परंतु निर्बंधामध्ये काही सूट सुद्धा दिली आहेच. यामध्ये पुणे जिल्ह्यातील दागिन्यांची दुकाने, कपड्यांची दुकाने सुरु असणार आहेत. तर पहा पुण्यात काय सुरु आणि काय बंद राहणार आहे त्याबद्दल अधिक सविस्तर.(Coronavirus Vaccination in Mumbai: 45 वयापेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी वॉर्डातील केंद्र आणि त्यासंबंधितची माहिती BMC कडून जाहीर)

-सोमवार ते शुक्रवार पर्यंत पुण्यातील सर्व दुकाने सुरु राहणार आहेत. मात्र  शनिवारी आणि रविवारी फक्त अत्यावश्यक सेवासुविधांची दुकाने सुरु करण्यास परवानगी असणार आहे. मात्र त्यावेळी अन्य दुकाने पूर्णपणे बंद राहणार आहेत.

-हॉटेल्सला फक्त होम डिलिव्हरीसाठी परवानगी असणार आहे. नागरिकांना हॉटेल्समध्ये बसून खाण्यास बंदी असणार आहे.

-सार्वजनिक वाहतूक असलेली पी एम टी बंद राहणार आहे.

-उद्याने, मैदाने पूर्णपणे बंद राहणार आहेत.

-सरकारी कार्यालये 50 टक्के कर्मचाऱ्यांसह सुरु ठेवता येणार आहेत.

-दारुचे दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहतील.

-दुपारी 3 वाजल्यानंतर संचारबंदी लागू असणार आहे.

-संचारबंदी दरम्यान फक्त अत्यावश्यक सेवांसाठीच घराबाहेर पडता येणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 15,077 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात 184 जणांचा बळी गेला आहे. तसेच 33 हजार रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला असून राज्यात एकूण 57,46,892 रुग आहेत. तर 2,53,367 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.