COVID-19 Vaccine Update: Serum Institute of India कोरोना व्हायरस लसीचे 100 दशलक्ष अधिक डोस 2021 पर्यंत तयार करणार
Vaccine | Image used for representational purpose (Photo Credits: Oxford Twitter)

भारतामध्ये मागील सहा महिन्यांपासून घोंघावणारं कोरोना व्हायरसचं वादळ रोखण्यासाठी आता लवकरात लवकर लस उपलब्ध करण्यासाठी संशोधक काम करत आहेत. दरम्यान भारतामधील सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया ही जगातील सर्वाधिक लस उत्पादन क्षमता असलेली कंपनी आता लसीचे डोस दुप्पट करण्याच्या तयारीमध्ये आहे. दरम्यान आज Serum Institute of India कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, SII, Gavi, Vaccine Alliance आणि Bill & Melinda Gates Foundation एकत्रित मिळून 100 दशलक्ष अधिक कोरोना व्हायरस लसीचे डोस बनवणार आहेत. त्यासाठी बिल गेट्स फाऊंडेशनकडून $150 million ची अधिक मदत देण्यात आली आहे. याचा फायदा भारतासोबतच अल्प उत्पन्न असणार्‍या जगातील काही देशांना होणार आहे. त्यामुळे एकूण 2021 पर्यंत सीरम इन्स्टिट्युटने 200 दशलक्ष लसींचे उत्पादन करण्याची तयारी दाखवली आहे.

ब्रिटनच्या अ‍ॅस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून एकत्रितपणे कोरोना लसीवर संशोधन आणि मानवी चाचण्या सुरू आहेत. त्याच लसीच्या मानवी चाचण्या सीरम इन्स्टिट्युट भारतामध्ये 'कोविशिल्ड' या लसीच्या नावाने घेत आहे. सध्या मुंबईमध्येही त्याच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचण्या सुरू झाल्या आहेत. दरम्यान 2020 च्या शेवटापर्यंत लस हातामध्ये येईल अशी अपेक्षा आहे. मात्र लस तयार झाल्यानंतर त्याचे वितरण ही एक मोठी जबाबदारी आहे. आणि आता त्यासाठीच प्रयत्न सुरू आहेत. COVID-19 Vaccine: कोविड19 वरील लस 2024 वर्षाच्या अखेर पर्यंत उपलब्ध होणार असल्याची सीरम इंस्टीट्युट प्रमुख अदार पूनावाला यांची माहिती.

ANI Tweet

ऑगस्ट 2020 मध्येच बिल गेटस यांच्या संस्थेने 100 दशलक्ष डोस साठी मदत जाहीर केली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी सीरम इन्स्टिट्युटचे अदार पुनावाला यांनी भारताला पुढील वर्षभरात कोरोना लस द्यायची असल्यास आपल्या सरकारकडे सुमारे 80 हजार कोटींची तरतूद हवी आहे. ती आपल्या कडे आहे का? असा सवाल त्यांनी विचारला होता.

अंदाजे भारतामधेय कोविशिल्ड लसीची किंमत 3 अमेरिकन डॉलर म्हणजे भारतीय रूपयांमध्ये अंदाजे 225-250 रूपये इतकी असू शकतो. सध्या देशामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 61 लाखांच्या पार गेला आहे.