प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-PTI)

देशभरात कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा दररोज बहुसंख्येने रुग्णांचा आकडा वाढत आहे. ऐवढेच नाही तर लाखोच्या संख्येने रुग्ण आढळून येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी उपयुक्त असलेल्या लसीकडे लागले आहे. पण कोरोनावरील लस उपलब्ध होण्यासाठी आता अजून वेळ लागू शकतो. कारण जगातील सर्वाधिक मोठी असलेली लस निर्माती कंपनीचे प्रमुख यांनी असे म्हटले आहे की, येत्या 2024 च्या अखेर पूर्वी ही लस सर्वांना देण्यासाठी उपलब्ध होणार नाही आहे. सीरम इंस्टीट्युट ऑफ इंडियाचे (Serum Institute of India) सीईओ अदार पूनावाला (Adar Poonawalla) यांनी असे म्हटले आहे की, 2024 पर्यंत संपूर्ण जगातील लोकांपर्यंत लस पोहचू शकणार नाही आहे.

फाइनेंशिअल टाइम्स यांना दिलेल्या एका मुलाखतीत सीरम इंस्टीट्युटचे प्रमुख अदर पूनावाला यांनी म्हटले की, औषध कंपन्यांच्या उत्पादनात वेगाने वाढ झालेली नाही. तसेच 2024 च्या अखेर पर्यंत जगभरातील लोकांना मिळेल ऐवढी कोरोनावरील लस तयार होणार नाही आहे. त्यामुळे लसीच्या निर्मितीसाठी चार ते पाच वर्षांचा कालावधी लागू शकतो.(Bharat Biotech Covaxin Update: भारत बायोटेकच्या 'कोवॅक्सिन'ची प्राण्यांवर यशस्वी चाचणी; माकडांमध्ये Coronavirus च्या Antibodies केल्या विकसित)

संपूर्ण जगाचे लक्ष या कोरोनावरील लसीकडे लागले आहे. तर AstraZeneca सह डील अंतर्गत सीरम इंस्टीट्युट 68 देशांसाठी आणि Novavax सह ते 92 देशांसाठी लस तयार करत आहेत. पूनावाला यांनी पुढे असा दावा केला आहे की, जर कोरोनाची लस सुद्धा Measles आणि Rotavirus प्रमाणे दोन डोसची लस असल्यास जगभरासाठी त्याचे 15 बिलियन डोस द्यावे लागणार आहेत.(COVID-19 Vaccine Update: भारताच्या कोविड 19 वरील संभाव्य लस Covaxin चे Animal Trials अहवाल सकारात्मक; Bharat Biotech ची माहिती)

सीरम इंस्टिट्युट कडून एक लस तयार केली जात आहे. त्यानुसार 1 अरब डोस तयार केले जाणार आहेत. असे आश्वासन देण्यात आले आहे की, यामध्ये 50 टक्के भारतीयांसाठी ही लस असणार आहे. ही कंपनी रुस मधील गमलेया रिसर्च इंस्टीट्युटसह स्पूतनिक वॅक्सीन तयार करण्यामध्ये सामील आहे. तसेच विकसित देशांसाठी लसीचे डोस उपलब्ध करुन देण्यासाठी सीरम इंस्टिट्युट काम करत आहे.