Covid-19 Third Wave: देशात ऑगस्ट महिन्यात येणार कोरोनाची तिसरी लाट; ऑक्टोबरमध्ये रुग्णसंख्या शिगेला- Reports
Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

देशात ऑगस्ट (August) महिन्यात कोरोना व्हायरसची तिसरी लाट (Coronavirus Third Wave) येईल आणि ऑक्टोबर (October) महिन्यात ती उच्चांक गाठेल असे एका रिपोर्टमधून समोर आले आहे. या लाटेत दिवसाला 1 लाख रुग्ण आढळून येतील किंवा 150,000 लाखांहून अधिक नागरिक संक्रमित होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. हैदराबाद आणि कानपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मध्ये मथुकुमल्ली विद्यासागर आणि मनींद्र अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संशोधनातून समोर आलेल्या अहवालात असे म्हटले आहे. यात केरळ आणि महाराष्ट्राला सर्वाधिक धोका असल्याचे म्हटले आहे.

कोविड-19 ची तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेइतकी गंभीर नसेल. दुसऱ्या लाटेत दिवसाला 40,000 हून अधिक रुग्णांची नोंद झाली होती. परंतु, या वर्षातच्या सुरुवातील रुग्णसंख्येत होणारी घट याचा अचूक अंदाज संशोधकांनी मॅथमॅटिकल मॉडलच्या आधारावर मांडला होता. मे महिन्यामध्ये आयआयटी हैदराबादचे प्राध्यापक विद्यासागर यांनी ब्लूमबर्गला केलेल्या ईमेल मध्ये म्हटले होते की, मॅथमॅटिकल मॉडलच्या आधारावर भारतात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव येत्या काळात शिगेला पोहचू शकतो. सध्याच्या अंदाजानुसार जूनच्या अखेरपर्यंत दिवसाला 20,000 रुग्णांची नोंद होऊ शकते.

मात्र विद्यासागर यांच्या टीमचा अंदाज चुकला. त्यानंतर अंदाज चुकल्याचं सांगत त्यांनी कोरोना प्रादुर्भावत बदल झाल्याचे सांगितले. रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार करोना रुग्णसंख्येचा उच्चांक 3 ते 5 मे दरम्यान असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तर इंडिया टुडेला त्यांनी 7 मेच्या आसपास करोना रुग्णसंख्येचा उच्चांक काढला जाईल असं सांगितलं होतं. (COVID-19 Third-Wave: मुंबई मध्ये कसे असेल कोविड-19 च्या तिसऱ्या लाटेचे स्वरुप? TIFR चा रिपोर्टमधून समोर आली महत्त्वपूर्ण माहिती)

दरम्यान, कोरोना व्हायरसच्या डेल्टा वेरिएंटबद्दल तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. डेल्टा वेरिएंट कांजण्यांप्रमाणे अगदी सहज पसरतो आणि लस घेतलेल्या लोकांमध्येही संक्रमित होऊ शकतो. त्यामुळे लाटेचा धोका यामुळे वाढू शकतो. Indian Sars-CoV-2 Genomic Consortium (INSACOG) च्या रिपोर्टनुसार, मे, जून आणि जुलै महिन्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांमध्ये सुमारे 10 पैकी 8 जणांना डेल्टा वेरिएंटचा संसर्ग झाला होता.