कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत (Coronavirus Second Wave) अधिक संसर्गजन्य असलेल्या डेल्टा वेरिएंटचा (Delta Variant) संसर्ग देशातील 80 टक्के लोकांना झाला आहे. विशेष म्हणजे लस घेतलेल्यांनाही याची लागण झाली असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (Indian Council of Medical Research) दिली आहे. लसीकरणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्यांची संख्या कमी झालेल्यांची संख्या कमी झालेली नाही, असे आयसीएमआरने (ICMR) केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे.
कोरोना पॉझिटीव्ह 677 रुग्णांवर अभ्यास करण्यात आला होता. यापैकी 71 जणांना कोव्हॅसिन लस घेतली होती. तर 604 जणांना कोविशिल्ड लस देण्यात आली होती आणि 2 जणांना Sinopharm लस देण्यात आली होती. एकूण 17 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून नमूने गोळा करण्यात आले होते. या एकूण नमुन्यांपैकी 86.09 टक्के व्यक्तींना डेल्टा वेरिएंटची लागण झाली होती. यापैकी 9.8 टक्के कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तर 0.4 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. (Delta Variant in India: भारतात पहिल्यांदाच आढळला कोरोना स्ट्रेन, WHO कडून ‘डेल्टा’ आणि ‘कप्पा’ असे नामकरण)
अभ्यास करण्यात आलेल्या व्यक्तींपैकी 482 जणांना एक किंवा अधिक लक्षणे दिसून आली होती. तर 29 टक्के लोक asymptomatic होते. यामध्ये अंग दुखणे, डोकेदुखी (56%), खोकला (45%), घसा सुजणे (37%), चव आणि वास न येणे (22%), श्वास घेण्यास त्रास होणे (6%) अशी लक्षणे दिसून येत होती. डेल्टा वेरिएंट एकूण जगभरामध्ये 111 देशांमध्ये पसरला असल्याची माहिती WHO ने दिली आहे. जगभरातील कोरोना व्हेरिएंट पैकी हा वेरिएंट सर्वात घातक असून शकतो, असे तज्ञांचे म्हणणे आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोविशिल्ड आणि कोव्हॅसिन या दोन्ही लसी कोरोना व्हायरसच्या डेल्टा वेरिएंटविरुद्ध प्रभावशाली आहेत. सीरम इंस्टीट्युटने कोविशिल्ड आणि भारत बायोटेकने कोव्हॅसिनची निर्मिती केली आहे.