ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने (Transparency International) आपल्या नव्या जागतिक अहवालात जवळपास 180 देशांची एक यादी जाहीर केली आहे. ही यादी जगभरातील कोणता देश भ्रष्टाचाराच्या बाबतीत कोणत्या स्थानावर आहे हे दर्शवते. 'करप्शन परसेप्शन इंडेक्स' (Corruption Perception Index) नावाने प्रकाशित झालेला हा अहवाल जगभरातील देशांची भ्रष्टाचारातील स्थिती दर्शवतो. या अहवालावरुन लक्षात येते की, जगभरातील कोणताच देश भ्रष्टाचारच्या बाबतीत पाठिमागे नाही. त्यात थोड्याफार प्रमाणात कमी अधिक इतकाच काय तो फरक. या नव्या अहवलात प्रत्येक देशाला 0 ते सर्वात कमी भ्रष्टाचारासाठी 100 गुण देण्यात आले आहेत. या परमाणानुसार, नॉर्डिक देश असलेला डेन्मार्क 90% गुण मिळवून सर्वात कमी भ्रष्टाचारी देश ठरला आहे. तर फिनलंड आणि न्युझीलंडसुद्धा 87 गुण मिळवत वरच्या स्थानावर आहेत. या देशात लोकशाही आणि मानवाधिकाराबद्दल असलेला सन्मान अधिक घट्ट दिसून आला. ज्यामुळे देशात सर्वाधिक शांतताही पाहायला मिळत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. हे सगळे वाचल्यावर भारताचा क्रमांक कितवा याबाबतही आपल्याला उत्सुकता वाटली असेल. घ्या जाणून.
अहवालात म्हटले आहे की, पश्चिम युरोपमधील अधिक देशांनी बऱ्यापैकी गुण मिळवत भ्रष्टाचार कमी असलेल्या देशांमध्ये वरचे स्थान पटकावले आहे. पण, काही देशांमध्ये पाठिमागीलकाही वर्षांमध्ये घसरणही होत आहे. म्हणजेच या देशामध्ये भ्रष्टाचार बऱ्यापैकी वाढला आहे. यात जर्मनीचाही समावेश आहे. जर्मनीला 97% गुण मिळाले आहेत. त्यामुळे हा देश टॉप 10 मध्ये असलयाचे दिसतो. परंतू, पाठिमागील वर्षाच्या तुलनेत आकडा घसरला आहे.
इंग्लंडचा क्रमही धक्कादायक रित्या घसरला असून या देशाला 73 गुण मिळालेआहेत. सर्वजनिक खर्च, लॉबींग आणि इतर घोटाळ्यांमुळे हे स्थान घसरल्याची चर्चा आहे. दरम्यान, स्वित्जर्लंड आणि नेदरलँड अनुक्रमे 82 आणि 80 व्या स्थानावर आहेत.
भारत आणि दक्षिण एशियाई देश
भारताबाबत बोलायचे तर आगोदर प्रमाणेच भारत 40 गुण मिळवून 85 व्या स्थानावर आहे. तर भारताच्या तुलनेत पाकिस्तान मात्र भरताच पाठिमागे आहे. भ्रषाचाराच्या बाबतीत पाकिस्तान केवळ 27 गुण मिळवून तब्बल 140 व्या स्थानावर आहे. तर बांग्लादेशही 25 गुणांसह 147 व्या स्थानावर आहे. अहवालात म्हटले आहे की, सर्वात खाली असलेल्या देशामध्ये सोमालियाचा समावेश आहे. सोमालियाला केवळ 12 गुण मिळाले आहेत. दक्षिण सुदान आणि सीरियासुद्धा बरेच खाली आहेत.