शेअर बाजारात सेनसेक्स 137.94 तर निफ्टी 39.15 अंकांनी घसरला
शेअर मार्केट (फोटो सौजन्य- फेसबुक)

भारतातसह संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोविड-19 मुळे व्यापार आणि उद्योगधंद्यांवर सुद्धा परिणाम झाला आहे. भारतीय बाजारात सुद्धा त्याचे परिणाम दिसून येत आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजारात घसरण दिसून आली. पण गुरुवारी सेनसेक्समध्ये तेजी दिसली खरी पण शुक्रवारी पुन्हा सेनसेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांना याचा वारंवार फटका बसत असल्याचे ही दिसून येत आहे. दुसऱ्या बाजूला सोन्याचे दर सुद्धा कमी होत चालले आहेत.

शुक्रवारी सकाळी सेनसेक्स 211.69 अंकांनी सुरु होत 28,499.92 वर बंद झाला. मात्र पुन्हा त्यात घसरण होऊन 137.94 अंकांवर स्थिरावत 28,150.29 वर पोहचला आहे.(Coronavirus: 31 मार्चपर्यंत देशातील 5 लाख रेस्टॉरंट बंद; NRAI ने जारी केले निवेदन)

तसेच निफ्टीमध्ये सुद्धा 108.75 अंकांनी सुरु होत 8,372.20 वर स्थिरावला. पण त्यात ही आता 39.15 अंकांनी घसरण झाली असून 8,224.30 वर बंद झाला आहे.

गुरुवारी सेनसेक्सच्या पार्श्वभुमीवर बजाज फायनान्स यांना सर्वाधिक नुसकान होत त्यांना 10.24 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली. त्याचसोबत अॅक्सिस बँक, महिंद्रा अॅन्ड महिंद्रा, टेक महिंद्रा आणि ओएनजीसी यांनी सुद्धा फटका बसला. मात्र आयटीसी, भारती एअरटेल, कोटक बँक आणि हिरो मोटो कार्र यांना शेअर बाजारात नफा झाला. आशियाई खंडातील अन्य शेअर बाजाराबाबत बोलायचे झाल्यास दक्षिण कोरियाच्या कोस्पी मध्ये गुरुवारी सर्वाधिक 8 टक्के घसरण दिसून आली.