
अलिगढ मुस्लिम यूनिवर्सिटीमध्ये (Aligarh Muslim University) केवळ 20 दिवसांमध्ये 44 व्यक्तींचा कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गामळे मृत्यू झाला आहे. यात 26 प्रोफेसर्सचा समावेश आहे. कोरोना व्हायरस संसर्गाने मृत्यू झालेल्या प्रोफेसर्समध्ये सेवेत असलेल्या 16 आणि 10 सेवानिवृत्त झालेल्या 10 प्रोफेसर्सचा समावेश आहे. एकाच वेळी इकत्या मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाल्याने संशय व्यक्त केला जात आहे की, अलिगढ विद्यापीठामध्ये कोरोनाचा एखादा नवा व्हेरीएन्ट आला असावा. विद्यापीठाच्या कुलपतींनी म्हटले आहे की, इथून नेण्यात आलेले सर्व नमुने तपासण्यासाठी आयसीएमआरला कळविण्यात आले आहे. एमयूचे कुलपती तारिख मन्सूर यांच्या बंधुंचेही कोरोना व्हायरस संसर्गामुळे निधन झाले आहे. कुलपती तारिक मन्सूर यांनीही विद्यापीठात कोरोनाचा एखादा नवा व्हेरीएन्ट आला असू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली आहे.
अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या कुलपतींच्या मागणीवरुन विद्यापीठातील कथीत व्हेरीएन्टच्या तपासणीसाठी नमुने गोळा करण्यात आले आहेत. एकत्र करण्यात आलेले नमुने दिल्ली येथे सीएसआईआर इंस्टीट्यूट ऑफ जिनॉमिक्स एंड इंटीग्रेटिव बायॉलजी येथे तपासासाठी पाठविण्यात आले आहेत. कुलपती तारिक मन्सूर यांनी आयसीएमआरला एक पत्र लीहून विद्यापीठातील व्हेरीएन्टच्या तपासणी करण्याबाबत कळवले आहे. दरम्यान, कुलपतींच्या पत्रावर आयसीएमआरकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आली नसल्याचे वृत्त वृत्तसंस्था आयएनएसने दिले आहे. दरम्यान, अलिगढ मुस्लिम यूनिवर्सीटी परिसरात विद्यापीठाच्याच एका आयसीएमआर प्रमाणीत लॅबद्वारा नमुने गोळा करण्यात आले आहेत.
अलिगढ मुस्लिम यूनिवर्सीटीच्या पत्रामध्ये आयसीएमआरला विनंती करण्या आली आहे की, शक्य तितक्या लवकर या व्हिरिएन्टची तपासणी करावी. या तपासातून आढळून येईल की विद्यापीठात कोणता नवा व्हेरिएन्ट विकसित झाला आहे किंवा नाही. (हेही वाचा, गुजरात मध्ये गोशाळेत कोरोना सेंटर सुरु, रुग्णांना दिली जातायत दूध आणि गोमुत्रापासून तयार केलेली औषधे)
विद्यापीठात ज्या प्रोफेसर्सचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे त्यात पोस्ट हार्वेस्ट इंजिनियरिंग विभागाचे प्रफेसर मोहम्मद अली खान (60),राज्यशास्त्र विभागाचे के प्रो. काजी मोहम्मद जमशेद (55), मानसशास्त्र विभागाचे अध्यक्ष प्रो. साजिद अली खान (63), संग्रहालय विभागाचे अध्यक्ष मोहम्मद इरफान (62), महिला अध्ययन केंद्राचे डॉ. अजीज फैसल (40), इतिहास विभागाचे डॉ. जिबराइल (51), इंग्रजी विभागाचे डॉ. मोहम्मद यूसुफ अंसारी (46), उर्दू विभागाचे डॉ. मोहम्मद फुरकान संभली (43) आणि जूलॉजी विभागाचे प्रोफेसर सैयद इरफान अहमद (62) यांचा समावेश आहे.