Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

देशात यापूर्वी यासाठी उत्पादक नव्हता मात्र आता 111 स्वदेशी उत्पादक असून त्यांच्याकडे 1.4 कोटी पेक्षा अधिक पीपीईची ( PPE) मागणी नोंदवण्यात आली आहे, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे. ही माहिती देतानाच 2 कोटी पीपीईच्या अंदाजित मागणीसाठी 2.2 कोटी हुन अधिक पीपीईची ऑर्डर आम्ही दिली आहे. कोविड-19 विरुद्धच्या देशातल्या लढ्यात, वैद्यकीय सामग्रीची खरेदी आणि उत्पादन यामधील प्रगतीबाबत अधिकारप्राप्त गट 3 चे अध्यक्ष पी डी वाघेला यांनी सादरीकरण केले. कोविड-19 मुळे निर्माण झालेले आव्हान भारताने, पुरवठा साखळी निर्माण करण्याची, पीपीईची देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवण्याची संधी म्हणून घेतले, असे वाघेला यांनी या वेळी सांगितले.

प्राप्त माहितीनुसार देशात विविध वस्तू बनवणाऱ्या स्वदेशी कंपन्यांनी पीपीई किट (पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट्स) बनविण्याची तयारी दर्शवली आहे. या कंपन्यांनी बनवलेली पीपीई किट परिक्षणासाठी सरकारी प्रयोगशाळांकडे पाठविण्यात आले आहे. या प्रयोगशाळांमध्ये झालेल्या तपासणीत पीपीई किट निकशांना पात्र झाली आहेत.

पीटीआय ट्विट

केंद्र सरकारने माहिती देताना पुढे म्हटले आहे की, 4 लाखांपेक्षा अधिक ऑक्सिजन सिलेंडर्स उपलब्ध असून ते आजच्या आवश्यकतेसाठी पुरेसे आहेत. आणखी एक लाख सिलेंडर्ससाठी ऑर्डर देण्यात आली आहे. औद्योगिक ऑक्सिजनचे रूपांतर देखील वैद्यकीय ऑक्सिजनमध्ये करण्यात येत आहेत. (हेही वाचा, Lockdown संपल्यावर घराबाहेर पडताना काय काळजी घ्याल?)

पीटीआय ट्विट

दरम्यान, आपल्याकडे 75,000 व्हेंटिलेटर्सची मागणी असून त्यापैकी सुमारे 20,000 सध्या उपलब्ध आहेत. तसेच आणखी 60,000 व्हेंटिलेटर्सची ऑर्डर देण्यात आली आहे. प्रशिक्षण आणि स्थापना याद्वारे सुविधा आणि सहाय्य पुरवून व्हेंटिलेटरची मागणी पूर्ण करण्यात येत आहे, असेही सरकारने म्हटले आहे.