Lockdown संपल्यावर घराबाहेर पडताना काय काळजी घ्याल?
कोरोना व्हायरस हे संकट इतक्यात दूर होणारे नाही. त्यामुळे लॉकडाऊन संपला की हे संकट दूर झाले असा समज कोणी बाळगण्याचे कारण नाही. त्यामुळे लॉकडाऊन संपला तरीही आपले आरोग्य, व्यायाम, आहार आणि औषधं याकडे नियमीत लक्ष द्यायला हवे. सामाजिक आणि व्यक्तिगत स्वच्छता. ताण-तणावापासून स्वत:ला दूर ठेवणे, यांवर प्रत्येकाने विशेष लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे अवघा देश लॉकडाऊन (Lockdown) आहे. जगभरातही कमी अधिक प्रमाणात अशीच स्थिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च या दिवशी पहिल्यांदा लॉकडाऊन जाहीर केला. हा लॉकडाऊन 21 दिवसांचा होता. त्यामुळे तो 21 दिवसांनंतर संपुष्टात येईल असे वाटत असतानाच तो पुढे 3 मे पर्यंत वाढविण्यात आला. येत्या 3 मे नंतर लॉकडाऊन काहीसा शिथील करण्याचे संकेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी दिले आहेत. लॉकडाऊन समाप्त करण्याची अधिकृत घोषणा अद्यापही झाली नाही. मात्र, भविष्याची काळजी म्हणून लॉकडाऊन संपल्यानंतर घराबाहेर पडताना काय काळजी घ्यायला पाहिजे यावर आतापासूनच विचार करायला हवा. म्हणूनच जाणून घ्या लॉकडाऊन संपल्यानंतर घराबाहेर पडताना काय काळजी घ्यावी.
लॉकडाऊन संपल्यावर घराबाहेर पडताना घ्यावयाची काळजी
मास्कचा वापर
लॉकडाऊन शिथिल केला अथवा समाप्त झाला तरी आव्हान संपले नाही. संकट टळले नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येक व्यक्तिने घराबाहेर पडताना मास्क वापरणे अथवा तोंडाला रुमाल बांधणे आवश्यक आहे. सिंगल यूज मास्क असेल तर तो पुन्हा वापरु नये. रियुजेबल म्हणजे पुन्हा वापरता येणारा मास्क असेल तर तो मास्क अथवा रुमाल हा प्रत्येक वेळी धुतलेला आणि स्वच्छ असायला हवा. हा मास्क किंवा रुमाल कोरड्या हवेत पूर्ण सुकलेला (वाळलेला) असेल याचीही खबरदारी घ्यायला हवी.
व्यक्तिगत मास्कचा वापर
मास्क ही प्रत्येकाची व्यक्तिगत गोष्ट आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तिने तो स्वत:चा स्वत:च वापरायला हवा. दुसऱ्याचा रुमाल, मास्क वापरायचाच नाही. हा नियम अत्यंत काटेकोरपणे पाळायला हवा. (हेही वाचा, प्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमकं काय? यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल? जाणून घ्या प्लाझ्मा थेरपीचे फायदे, इतिहास, उपचारपद्धती याबद्दल सविस्तर माहिती)
सोशल डिस्टंन्सीग
घराबाहेर पडल्यानंतर बाजार, प्रवास, कार्यालय, सार्वजनिक ठिकाणे आदी ठिकाणी सोशल डिस्टंन्सींगचा वापर कटाक्षाने करायला हवा. आपले मित्र परिवार, नागरिक, अथवा गर्दीची ठिकाणे आदी ठिकाणी आपला वावर सावध असायला हवा. गळाभेट, हस्तांदोलन, मिठी, अथवा इतर जवळीक कटाक्षाने टाळायला हवी.
वारंवार हात धुणे
लॉकडाऊन समाप्त झाल्यावर अथवा शिथील झाल्यानंतर घराबाहेर पडताना वारंवार हात धुण्याची सवय लाऊन घ्यायला हवी. सार्वजनिक ठिकाणी, कार्यालयं, धार्मिक स्थळं आदी ठिकाणी साबनाने हात स्वच्छ धुवायला हवा. सॅनिटायझर वापरले तरी चालू शकते. मात्र, प्रत्येक वेळी सॅनिटायझर वापरणे शक्य होईलच असे नाही. तसेच, प्रत्येकाला आर्थिक दृष्ट्या ते परवडेल असेही नाही. त्यामुळे साबनाने हात स्वच्छ धुणे केव्हाही चांगले.
कोरोना व्हायरस हे संकट इतक्यात दूर होणारे नाही. त्यामुळे लॉकडाऊन संपला की हे संकट दूर झाले असा समज कोणी बाळगण्याचे कारण नाही. त्यामुळे लॉकडाऊन संपला तरीही आपले आरोग्य, व्यायाम, आहार आणि औषधं याकडे नियमीत लक्ष द्यायला हवे. सामाजिक आणि व्यक्तिगत स्वच्छता. ताण-तणावापासून स्वत:ला दूर ठेवणे, यांवर प्रत्येकाने विशेष लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
(The above story first appeared on LatestLY on May 01, 2020 05:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

