Ram Mandir बांधण्यासाठी सुरु केलेली जनसंपर्क मोहीम पूर्ण; तब्बल 2500 कोटींचे दान जमा, 9 लाख कामगार 10 कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचले
Ram Mandir (Photo Credits: Twitter)

15 जानेवारीपासून विश्व हिंदू परिषदेने राम मंदिर (Ram Mandir) बांधण्यासाठी सुरु केलेली जनसंपर्क मोहीम (Door-to-Door Fund Collection) 27 फेब्रुवारी रोजी पूर्ण झाली. ही मोहीम देशभर चालविण्यात आली. 42 दिवस चाललेल्या या मोहिमेदरम्यान लोकांनी मंदिर बांधण्यासाठी दिलखुलास दान केले. विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय उपाध्यक्ष आणि श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासचे सरचिटणीस चंपत राय (Champat Rai) म्हणाले की, मंदिर बांधकामासाठी समर्पण निधी 2500 कोटींचा आकडा पार करेल. येत्या तीन वर्षांत राम मंदिर बांधून तयार होईल.

तीन बँक खात्यात सतत देणगी जमा केली जात आहे. मंदिर बांधण्यासाठी लोकांनी किती पैसे दिले आहेत हे सांगण्यासाठी ऑडिट केले जाऊ शकते. मंदिर बांधण्याच्या या जनसंपर्क मोहिमेमध्ये चार लाख गावे आणि शहरांमधील 10 कोटी कुटुंबांपर्यंत पोहोच गेली. एकूण 9 लाख कामगार घरोघरी गेले आणि हा निधी 38125 कामगारांच्या माध्यमातून बँकांमध्ये जमा झाला. चंपत राय यांच्या म्हणण्यानुसार मंदिराच्या बांधकामासाठी अंदाजे खर्च पूर्वी 400 कोटी रुपये होता, परंतु आता असे दिसते की हा खर्च त्यापेक्षा दीडपट जास्त असेल.

चंपत राय यांच्या मते, मंदिर बांधण्यासाठी मुस्लिम समाजातील हजारो लोकांनी मोठ्या प्रमाणात देणगी दिली. बर्‍याच जणांनी पाच लाख, दोन लाख अशा पावत्या केल्या. संपूर्ण ऑपरेशन पारदर्शक होण्यासाठी 49 नियंत्रण केंद्रे सुरू केली गेली आणि दिल्लीतील दोन सनदी लेखापाल यांच्या नेतृत्वात 23 कार्यकर्त्यांनी खात्यावर नजर ठेवण्यासाठी भारतभर संपर्क साधला. मोहीम पूर्ण झाली असली तरी लोक आपली देणगी बँक खात्यांमधून जमा करू शकतात. लवकरच सर्व निधीचे ऑडिट केले जाईल आणि ते सार्वजनिक केले जाईल. (हेही वाचा: Food Wastage: भारतामध्ये प्रत्येक वर्षी प्रती व्यक्ती 50 किलो अन्नाची नासाडी; UNEP च्या अहवालामधून धक्कादायक माहिती)

सद्य माहितीनुसार राजस्थानमधून सर्वाधिक रक्कम मिळाली आहे. तामिळनाडूमधून 85 कोटी, केरळमधून 13 कोटी आणि पूर्वोत्तर राज्यातील अरुणाचल प्रदेशातून 4.5 कोटी, मणिपूरमधून 2 कोटी, मिझोरममधून 21 लाख, नागालँडमधून 28 लाख आणि मेघालयातून 85 लाख प्राप्त झाले आहेत.