COVID Vaccine साठी Co-WIN ॲपवर रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती
Vaccination (Photo Credits-Twitter)

COVID19 Vaccination Registration: देशभरात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक कमी होत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला लसीकरणाचा वेग अधिक वाढवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना शासनाच्या कोविन अॅपच्या माध्यमातून लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करावे लागत होते. अशातच 13 जून पर्यंत देशात 24.84 कोटी लसीचे डोस घेण्यासाठी कोविन अॅपवर रजिस्ट्रेशन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 19.84 कोटी डोस जवळजवळ 80 टक्के सर्व डोस नागरिकांना थेट केंद्रावर जाऊन दिले गेले आहेत.(धक्कादायक! Covid-19 टेस्ट करताना सरपंचांच्या नाकातच मोडली Swab Stick; घशात जाऊन अडकली, जाणून घ्या काय घडले पुढे)

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी असे म्हटले की, प्री बुकिंग आणि प्री-ऑनलाईन रजिस्ट्रेशनची कोविड लसीकरणासाठी गरज नसणार आहे. सरकारच्या मते, 18 वर्षावरील किंवा त्याहून अधिक वय असलेल्यांना जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊनच रजिस्ट्रेशन केल्यानंतर लस घेता येणार आहे. याला आपण वॉक-इन लसीकरण सुद्धा असे बोलले जाऊ शकते. आरोग्य मंत्रालयाने असे म्हटले की, कोविन अॅपवर नोंदणी करण्याच्या विविध पद्धतींपैकी एक आहे.(Covid-19 Update in India: कोविड-19 रुग्णसंख्या वाढीत 75 दिवसांमधील मोठी घट; पहा आजची आकडेवारी)

आरोग्य कर्मचारी किंवा आशा च्या कर्मचारी ज्या ग्रामीण भागात राहतात त्यांच्यासाठी थेट लसीकरण केंद्रावर रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांना लस मिळणार आहे. या सुविधेच्या मदतीसाठी 1075 क्रमांकावर सुद्धा संपर्क करता येणार आहे. तर आरोग्य मंत्रालयाने पुढे असे म्हटले आहे की, 1 मे पासून ते 12 जून दरम्यान एकूण 1,03,585 कोविड लसीकरण केंद्राकडून लसीकरणाची सुविधा दिली जात आहेत. त्यात 26,114 ही सब-हेल्थ सेंटर्स, 26,287 ही प्रायमरी हेल्थ सेंटर आणि 9441 ही कम्युनिटी हेल्थ सेंटरच्या रुपात काम करत आहेत.