नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात अद्याप विविध ठिकाणी हिंसा भडकवण्याचा प्रकार सुरु आहे. याच प्रकरणी गुरुवारी लखनौ मधील एकाचा आणि मंगलौर येथील दोन जणांचा मृत्यू झाला. तसेच लखनौ मध्ये झालेल्या हिंसाचारानंतर गाजियाबाद, मऊ, आजमगढ, फिरोजाबाद, संभल, अलीगढ, मेरठ, सहारनपुर, बरेली, आग्रा यांच्या सह अन्य ठिकाणी इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली आहे. त्याचसोबत विविध ठिकाणी तणावाचे वातावरण सुद्धा आहे. खासकरुन जुने लखनौ आणि मुस्लिम बहुल परिसरात तणावाची स्थिती आहे. मात्र या ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आला आहे.
लखनौ येथे झालेल्या हिंसक आंदोलनामुळे युनिव्हर्सिटीने त्यांच्या शुक्रवारी होणाऱ्या परिक्षा रद्द केल्या आहेत. त्याचसोबत बुंदेलखंड युनिव्हर्सिटीने सुद्धा त्यांच्या सर्व परिक्षा रद्द केल्याचे सांगितले आहे. तर राजधानी दिल्ली येथे मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांनी जामिया मिलिया इस्लामिया, जसोला विहार, शाहीन बाग येथे सुद्धा आज ट्रेन थांबणार नसल्याची माहिती दिली आहे. तसेच जामा मस्जिद परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.(Citizenship (Amendment) Act, 2019: युरोप राष्ट्रांकडून प्रेरीत हिंदू राष्ट्र संकल्पना भारताला बेचिराक करेन: इतिहासकार रामचंद्र गुहा यांचा इशारा)
ANI Tweet:
Delhi Metro Rail Corporation (DMRC): Entry & exit gates of Jamia Millia Islamia and Jasola Vihar Shaheen Bagh are closed. Trains will not be halting at these stations. pic.twitter.com/MG73aDzq5T
— ANI (@ANI) December 20, 2019
देशातील काही ठिकाणी अद्यापही नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात जोरदार आंदोलने केली जात आहेत. या दरम्यान सार्वजनिक संपत्तीचे सुद्धा नुकसान करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांकडून अधिक ताफा तैनात करण्यात आला असून या प्रकारांवर नियंत्रण ठेवले जात आहे. अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, काही लोक एनआरसी आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात चुकीच्या गोष्टी पसरवत असल्याचे म्हटले आहे.