भारतीय लष्करात होणार 'चीफ ऑफ डिफेन्स' पदाची निर्मिती; स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील IMP मुद्दे
PM Narendra Modi | (Photo Credits- ANI)

IMP points of PM Modi's speech on Independence Day: देशभरात आज (15 ऑगस्ट) 73 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राजधानी दिल्ली येथील ऐतिहासिक लाल किल्ल्यावरुन (Red Fort) देशवासियांना संबोधीत केले. आजच्या भाषणात पंतप्रधानांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. पंतप्रधान मोदी यांचे हे भाषण साधारण 45 मिनिटे चालले. ज्यात त्यांनी कलम 370, तिहेरी तलाक विधेयक, चांद्रयान, अर्थव्यवस्था, लष्कर, पर्यावरण, स्वच्छ भारत यांसह विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच, लष्कराच्या तिन्ही दल प्रमुखांमध्ये समन्वय साधण्यासाठी 'चिफ ऑफ डिफेन्स' (Chief of Defence Staff) हे पद निर्माण करणार असल्याचेही सांगितले. जाणून घेऊया पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील हे सात महत्त्वाचे मुद्दे.

पंतप्रधानांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

लष्करात 'चीफ ऑफ डिफेन्स' पदाची निर्मिती

आजच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी भारतीय लष्कराबाबत सर्वात मोठी घोषणा केली. ते म्हणाले, सरकार लष्कराच्या तिन्ही प्रमुखांवर एक प्रभारी नेमणार असून, त्यासाठी 'चीफ ऑफ डिफेन्स' हे पद निर्माण करणार आहे. लष्करातील तीन्ही दलांच्या प्रमुखांमध्ये समन्वय साधण्यासाठी 'चीफ ऑफ डिफेन्स' या नव्या पदाची निर्मीती केली जाणार असल्याचेही ते म्हणाले.

जम्मू-काश्मीरमधून 370 कलम हटविण्याची विरोधकांमध्ये हिंमत नव्हती

लाल किल्ल्यावरुन भाष करताना पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना चांगलाच टोला लगावला. ते म्हणाले, जम्मू काश्मीर राज्यातून कलम 370 हटविल्यानंतर तेथील अदिवासी, महिला, दलित, सर्वसामान्य जनतेला अधिकार मिळाले. हे कलम हटविण्याची विरोधकांमध्ये हिंमत नव्हती. आम्ही ती दाखवली. हे कलम जर इतकेच महत्त्वाचे होते तर, विरोधकांनी बहुमताने सत्तेत असताना ते कायम का केले नाही. तात्पुरते का ठेवले?, असा सवालही पंतप्रधानांनी विचारला. (हेही वाचा, Indian Independence Day 2019: ध्वजवंदनानंतर खराब झालेले, फाटलेले झेंडे आढळल्यास काय कराल?)

तिहेरी तलाक विधेयकाने भीती दूर झाली, अधिकार मिळाला

आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी तिहेरी तलाकचा उल्लेख करणार हे अपेक्षीतच होते. या मुद्द्यावर बोलताना पंतप्रधान म्हणाले, तिहेरी विधेयकानं मुस्लिम महिलांना नवा अवकाश मिळाला. देशातील हजारो महिला तिहेरी तलाख भीतीच्या छायेत होत्या. प्रत्येक वेळी तिरेही तलाख होईल असे नाही. पण, तो केव्हाही होऊ शकतो, अशी भीती सातत्याने त्यांच्या मनात होती. तिहेरी तलाक विधेयकाने ती दूर झाली.

दहशतवाद समर्थकांची गय केली जाणार नाही

देश दहशतवादाविरुद्ध लढतोय. दहशतवादाला पाठिंबा, आश्रय आणि मदत देणाऱ्यांना शिक्षा दिली जाईल. विकासासाठी सुरक्षा आणि स्थिरता महत्त्वाची आहे. केवळ भारत नव्हे तर शेजारील देशही दहशतवादासोबत लढत आहे. बांग्लादेश आणि अफगानिस्तान हे देशही दहशतवादाविरोधात लढत आहेत.

स्थिर सरकार, स्थिर प्रशासन असेल तर अवघे जग विश्वास ठेवते

आगामी काळात अर्थव्यवस्था 5 ट्रीलीयन डॉलरवर नेण्याचे सरकारचे लक्ष. त्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी स्थिर सरकार, स्थिर प्रशासनाची आवश्यकता असते. जर स्थिर सरकार, स्थिर प्रशासन असेल तर अवघे जग विश्वास ठेवते. अर्थव्यवस्थेला चालणा देण्यासासाठी लघु उद्योजकांची ताकद वाढवणे गरजेचे आहे. मध्यम वर्गातील लोकांना त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी सूविदा द्याव्या लागतील. तसेच, देशाच्या पर्यटनालाही चालना देणे आवश्यक आहे.

छोटं कुटुंब ही देखील देशसेवाच

वाढती लोकसंख्या हे देशासमोरील मोठे आव्हान आहे. त्यामुळे छोटे कुटुंब सुखी कुटंब हा विचार करणे गरजेचे आहे. अनेक छोटी कुटुंब आहेत. ज्यांनी देशहीताचा आणि विकासाचा विचार केला. आपलं कुटुंब छोटं असणं ही देखील एक देशसेवाच आहे.

वन नेशन, वन इलेक्शन यावर चर्चा व्हावी

देशात यापुढे एक देश, एक निवडणूक हे तत्व लागू व्हायला हवे. त्यासाठी वन नेशन, वन इलेक्शन यावर लोकशाही मार्गाने चर्चा व्हायला हवी. त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. जीएसटीमुळे वन नेशन वन टॅक्स करण्यात यश आले.

दरम्यान, आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी आम्ही जेव्हा 2014 मध्ये सत्तेत आलो तेव्हा एक निराशा होती. हा देश बदलू शकेल का असा प्रश्न लोक विचारात होते. सबका साथ सबका विकास या धोरणाने काम करण्यास सुरुवात केली. आज देशात उत्साह दिसतो असेही सांगितले.