आयआयटीच्या (IIT) विद्यार्थ्यांसाठी खुशखबर असून आता रेल्वेत प्रशिक्षणार्थीसाठी म्हणून काम करण्याची संधी उपब्लध करुन देण्यात आली आहे. या विभागात 992 जागांसाठी भरती होणार आहे. तर अर्ज करण्यासाठी 24 जून ही अंतिम तारिख ठेवण्यात आली आहे.
तर अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा 15 ते 25 वर्ष असावी. तसेच आयटीआयमधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना फिटर, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, कार्पेंटर, पेंटर, वेल्डर, प्रोग्रॅमिंग आणि सिस्टिम अॅडमिन असिस्टंटसाठी प्रशिक्षणार्थी म्हणून संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याचसोबत फ्रेशर्ससाठी फिटर, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, कार्पेंटर, पेंटर, वेल्डरसाठी प्रशिक्षणार्थ्यांना काम करण्याची संधी मिळणार आहे.(कॉलेज ऍडमिशन फॉर्म मध्ये निवडता येणार 'मानवता ' धर्माचा पर्याय, पश्चिम बंगाल मधील ५० कॉलेजांचा निर्णय)
चेन्नई मधील इंटिग्रल कोट फॅक्टरी या रेल्वेभरतीत अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षण दहावीत 50 टक्के गुण, विज्ञान आणि गणित विषय आवश्यक तसेच व्होकेशलन ट्रेनिंगचे प्रमाणपत्र असणे महत्वाचे आहे. तर फ्रेशर्स विद्यार्थ्यांसाठी दहावीत किमान 50 टक्के गुणांसह विज्ञान आणि गणित विषय असणे आवश्यक आहे.