केवळ एका कोडच्या आधारावर मिळणार तुमचा चोरीला गेलेला मोबाईल, केंद्र सरकारने तयार केला नवा डेटाबेस
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits : Twitter)

दिवसेंदिवस मोबाईलचा वाढता वापर लक्षात घेता 'जळी स्थळी काष्टी पाटनी' अशी लोकांची मोबाईल वापरण्याची पद्धत झाली आहे. जवळ स्वत:चा मोबाईल असणे ही जणू लोकांच्या मूलभूत गरजांपैकी एक महत्त्वाची गरज मानली जातेय. या मुळे मोबाईल चोरीच्या घटनाही वाढत चालल्या आहेत. त्यामुळे लोकांना अनेकदा आपल्या महागड्या मोबाईलला मुकावे लागते. यावर अनेकदा तोडगा काढूनही म्हणावा तसा प्रतिसाद न मिळाल्याने आता केंद्र सरकारने एक नवीन शक्कल लढविली आहे. याच्या माध्यमातून तुमचा चोरीला गेलेला मोबाईल तुम्हाला परत मिळवता येईल.

केंद्रीय दूरसंचार विभागाने देशातील सर्व मोबाईल्सचा एक डेटाबेस तयार केला आहे. या डेटाबेसला 'सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटीटी रजिस्टर' असं नाव देण्यात आले आहे. या डेटाबेसमध्ये देशातील सर्व मोबाईल्सचे IMEI क्रमांकाची नोंद करण्यात आली आहे. या क्रमांकाच्या आधारे येत्या काळात तुम्हाला तुमचा हरवलेला अथवा चोरी गेलेला मोबाईल शोधणे सोपे होईल. फोनची चोरी झाल्यास तात्काळ पोलिसांना कळविल्यानंतर या डेटाबेसमधून तुमचा फोन ब्लॉक करण्यात येईल. आणि इतर माहितीच्या आधारे त्याचा शोध घेण्यात येईल.

महाराष्ट्रात या पद्धतीने मोबाईल शोधण्याची चाचणी घेण्यात आली आहे. या चाचणीला समाधानकारक यश मिळाल्याने लवकरच ही सेवा संपुर्ण देशभर राबविण्यात येईल.

हेही वाचातुमचा फोन चोरीला गेला आहे? तर अशा पद्धतीने करा 'लॉक'

या सेवेमुळे मोबाईल चोरीच्या घटनेत घट होऊन मोबाईल चोरीला आळा बसेल अशी आशा पोलिसांनी व्यक्त केली आहे.