Drug Manufacturing Units Inspection: फार्मा कंपन्यांवर केंद्र सरकारची सर्जिकल स्ट्राईक, बनावट औषधांचा होणार पर्दाफाश
Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

कोरोना महामारीनंतर देशात आरोग्य सुविधा किती बळकट असावी ह्याचं महत्व आता पटलयं. आरोग्य सेवा मजबूत तर देश मजबूत या गोष्टीची जाणून केवळ भारताला नाही तर संपूर्ण जगाला झाली आहे. पण काही लोक असेही आहेत जे या आरोग्य सेवेचं शोषण करतात. आपल्याचं देशाची, आपल्याच देशातील लोकांची फसवणूक करतात. आजारपणात डॉक्टर हा देव आणि औषध हे अमृत ठरत. पण या अमृता ऐवजी विष प्रयोग करुन काही रुपयांसाठी इतरांचा जीव धोक्यात घालतात. हो, असे बरेच धक्कादायक प्रकार पुढे आले आहेत. देशात अनेक आजारावरील विविध कंपन्यांच्या नावाखाली बनावट औषधी विक्रीचं काम सुरु आहे. त्यात खरेदी करणाऱ्या ग्राहकाला कुठलं औषध खरं आणि कुठलं औषध खोटं हे समजायला देखील काही मार्ग नाही. सर्वसामान्य बिचारे आपलं आरोग्य सुधारण्यासाठी औषधी घेतात मात्र आता या औषधीचं आरोग्यासाठी घातक ठरल्या आहेत. तरी बनावट औषधांना चाप बसवण्यासाठी केंद्र सरकार औषधी उत्पादन युनिट्सची तपासणी करणार आहेत.

 

सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) राज्य औषध नियंत्रण प्रशासनासह देशभरातील औषध उत्पादन युनिट्सची संयुक्त तपासणी सुरू केली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या निर्देशानुसार ही तपासणी मोहिम सुरु करण्यात आली आहे. औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायदा, 1940 आणि त्याखालील नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी तर तपासणी, अहवाल आणि त्यानंतरच्या कारवाईच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी CDSCO मुख्यालयात दोन संयुक्त औषध नियंत्रकांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती देशभरातील औषध उत्पादन युनिट्सची तपासणी करणार आहेत. (हे ही वाचा:- Mock Drill In India: आज देशभरात होणार कोव्हिड19 मॉक ड्रिल, जाणून घ्या मॉक ड्रिल म्हणजे काय?)

 

आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की हे देशात उत्पादित औषधांची तपासणी करण्यासाठी ही मोहिम राबवण्यात येत आहे. देशात उपलब्ध असलेल्या औषधांची सुरक्षा, परिणामकारकता आणि गुणवत्ता सुनिश्चित करणे हे हा या तपासणी मागचा महत्वपूर्ण उद्देस आहे. मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स ड्रग्ज आणि कॉस्मेटिक्स कायद्याचे, विशेषत: चांगल्या उत्पादन पद्धतींच्या आवश्यकतांचे पालन करतात का हे पडताळण्यासाठी ही मोहिम राबवत असल्याचं केंद्रय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी सांगितलं आहे.