BSE Market Cap Hits 4 Trillion Dollar: बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजारी भांडवल प्रथमच USD 4 ट्रिलियन मार्कवर पोहोचले
Representational Image (Credits: Wikimedia Commons)

BSE-Listed Companies Market Cap: बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (Bombay Stock Exchange) वरील सर्व सूचीबद्ध प्रमुख कंपन्यांच्या एकत्रित बाजार मूल्यांकनाने बुधवारी (29 नोव्हेंबर) प्रथमच USD 4-ट्रिलियनचा टप्पा गाठला. 30 समभागांच्या बीएसई (BSE) सेन्सेक्सने दिवसाची सुरुवात सकारात्मक केली. त्यानंतर पहिल्या सत्रातच सेन्सेंक्स 305.44 अंकांनी वाढून 66,479.64 वर पोहोचला. इक्विटीमधील आशावादामुळे, बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल सकाळच्या व्यापारात 3,33,26,881.49 कोटी रुपयांवर पोहोचले. जे 83.31 च्या विनिमय दराने USD 4 ट्रिलियनमध्ये गणले गेले. बीएसई बेंचमार्क सेन्सेक्सने (BSE Sensex) या वर्षात आतापर्यंत 5,540.52 पॉइंट्स म्हणजेच 9.10 टक्‍क्‍यांनी वाढ केली आहे. या वर्षी 15 सप्टेंबर रोजी 30- समभागांच्या सेन्सेक्सने 67,927.23 चा ऐतिहासिक टप्पा गाठला. USD 4 ट्रिलियन एम-कॅप पेक्षा जास्त मूल्य असलेल्या इतर बाजारपेठांमध्ये यूएस, चीन, जपान आणि हाँगकाँगचा समावेश आहे.

दरम्यान, बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांनी मे 2007 मध्ये $1 ट्रिलियन एम-कॅपचा टप्पा गाठला होता. जुलै 2017 मध्ये, मार्केट कॅपने 2 ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडला आणि मे 2021 मध्ये, ते 3 ट्रिलियन डॉलरच्या वर पोहोचले. बाजार भांडवलाच्या बाबतीत, भारतीय शेअर बाजार निर्देशांक जागतिक स्तरावर पाचव्या स्थानावर आहे. केवळ युनायटेड स्टेट्स (47 ट्रिलियन डॉलर), चीन (9.7 ट्रिलियन डॉलर), जपान (5.9 ट्रिलियन डॉलर) आणि हाँगकाँग (4.8 ट्रिलियन डॉलर ) भारताच्या पुढे आहेत. बीएसईची ही आजवरची सर्वात ऐतिहासिक कामगिरी आहे. (हेही वाचा, Nifty hits New Record: मुंबई शेअर बाजारात निफ्टीने पहिल्यांदा गाठला 19 हजारांचा टप्पा!)

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज किंवा बीएसई हा मोठा सिक्युरिटीज भारतीय बाजार आहे. जे 1875 मध्ये मूळ शेअर आणि स्टॉक ब्रोकर्स असोसिएशन म्हणून प्रथम स्थापन केला गेला. बीएसईचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. ज्यामध्ये जवळपास 6,000 हून अधिक कंपन्या नोंदल्या गेल्या आहे. न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज (NYSE), लंडन, जपान आणि शांघाय स्टॉक एक्सचेंज यांच्यापाठोपाठ जगातील सर्वात मोठ्या एक्सचेंजपैकी एक म्हणून बीसएसईला ओळखले जाते. भारताच्या भांडवली बाजाराचा विकास करण्यासाठी BSE ने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच, भारतीय कॉर्पोरेट क्षेत्राच्या वाढीसही मदत केली आहे. बीएसई हे आशियातील पहिले स्टॉक एक्स्चेंज आहे आणि त्यात लहान आणि मध्यम उद्योगांसाठी इक्विटी ट्रेडिंग प्लॅटफॉर्म देखील समाविष्ट आहे. BSE ने इतर भांडवली बाजार सेवा प्रदान करण्यात विविधता आणली आहे ज्यात क्लिअरिंग, सेटलमेंट आणि जोखीम व्यवस्थापन समाविष्ट आहे.