
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (22 मे) बिकानेर ते मुंबई एक्स्प्रेस () ट्रेनच्या उद्घाटनाला हिरवा झेंडा दाखवला. ज्यामुळे महाराष्ट्र आणि राजस्थान या दोन राज्यांमधील थेट रेल्वे संपर्क (Rajasthan to Mumbai Connectivity) वाढण्यास मदच झाली. ही एक्सप्रेस ट्रेन मुंबईतील वाद्रे टर्मिनस ते राजस्थानातील बिकानेर दरम्यान धावेल आणि 23 तास 25 मिनिटांत 1213 किमी अंतर पार करेल. 04707 क्रमांकाची ही पहिली सेवा देशनोकेहून सकाळी 10.30 वाजता निघाली, 11.15 वाजता बिकानेरला पोहोचली आणि दुपारी 12.35 वाजता मुंबईला पोहोचली. ही ट्रेन दुसऱ्या दिवशी दुपारी 12.00 वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचेल.
बिकानेर-वांद्रे टर्मिनस एक्सप्रेस रेल्वे मार्ग आणि थांबे
बिकानेर-वांद्रे टर्मिनस एक्सप्रेसने आज आपला पहिला प्रवास सुरू केला, मार्गातील 19 प्रमुख स्थानकांवर थांबली. यामध्ये खालील स्थाककांचा समावेश आहे:
देशनोके, नोखा, नागौर, मेरता रोड जंक्शन, जोधपूर, पाली मारवाड, मारवाड जंक्शन, फालना, अबू रोड, पालनपूर, महेसाणा, साबरमती बीजी, नाडियाद, आनंद, वडोदरा, भरूच, सुरत, वापी आणि बोरिवली.
एक्सप्रेस ट्रेन सुटण्याची वेळ आणि वेळापत्रक
देशनोकेहून सकाळी 10.30 वाजता निघालेली ही विशेष सुरुवातीची ट्रेन सकाळी 11.15 वाजता बिकानेर स्थानकावर पोहोचली आणि नंतर दुपारी 12.35 वाजता मुंबईकडे प्रवास सुरू ठेवला, जिथे ती शुक्रवारी दुपारी 12.00 वाजता पोहोचणार आहे.
कोचची रचना आणि भाडे
उद्घाटनाच्या विशेष सेवेमध्ये 18 कोच आहेत, ज्यामध्ये 16 थर्ड एसी इकॉनॉमी (3ई) कोच आणि 2 पॉवर कार आहेत.
बिकानेर ते वांद्रे टर्मिनस या संपूर्ण प्रवासासाठी एसी 3 इकॉनॉमी क्लासचे तिकीट भाडे ₹1365 निश्चित करण्यात आले आहे.
पुढील आठवड्यापासून सुरू होणार नियमित सेवा
आजच्या (22 मे) औपचारिक शुभारंभानंतर, बिकानेर-वांद्रे टर्मिनस एक्सप्रेसचे नियमित व्यावसायिक परिचालन पुढील आठवड्यात सुरू होणार आहे, ज्यामुळे प्रवाशांना पश्चिम राजस्थान आणि मुंबई दरम्यान सोयीस्कर आणि परवडणारा प्रवास पर्याय उपलब्ध होईल.
दरम्यान, या नवीन एक्सप्रेस ट्रेनचे उद्घाटन भारतीय रेल्वेच्या कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या आणि प्रवासी सेवा सुधारण्याच्या सततच्या प्रयत्नांमध्ये आणखी एक पाऊल आहे. राजस्थान आणि महाराष्ट्रादरम्यान वाढत्या प्रवासाच्या मागणीसह, बिकानेर ते मुंबई एक्सप्रेस व्यवसाय, पर्यटन आणि प्रादेशिक विकासासाठी एक महत्त्वाचा दुवा बनण्याची अपेक्षा आहे.
भारतातील रेल्वे प्रवाशांची संख्या मोठी आहे. भारतात उपलब्ध असलेला स्वस्त आणि वेगवान प्रवास आणि वाहतूक मार्ग म्हणून रेल्वेकडे पाहिले जाते. भारतातील स्थलांतरितांची मोठी संख्या देशांतर्गत दळनवणासाठी भारतीय रेल्वे वाहतुकीवर अवलंबून असते.