Bihar Elections 2020: NDA सरकार पुढील पाच वर्षे टिकणार, निवडणूकीत विजय झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया
देवेंद्र फडणवीस (Photo Credits: PTI)

बिहार विधानसभा निवडणूकीत NDA ला पूर्ण बहुमत मिळाल्याने त्यांचा विजय झाला. याच पार्श्वभुमीवर नितीश कुमार यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची कमान देण्याचा निर्णय काल पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आज नितीश कुमार यांनी 7 व्या वेळेस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यावेळी केंद्रीय मंत्री अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डासह अन्य नेत्यांनी उपस्थिती लावली होती. या शपथविधी सोहळ्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, NDA चे सरकार पुढील पाच वर्ष टिकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.(Devendra Fadnavis: लोकशाहीत चर्चेला स्थानच नाही का? राणा दाम्पत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारला सवाल)

देवेंद्र फडणवीस यांनी पुढे असे ही म्हटले आहे की, NDA चा बिहार विधानसभा निवडणूकीत दणदणीत विजय झाला आहे. हे सरकार पुढील 5 वर्ष टिकून राहील आणि राज्याला नक्कीच पुढे घेऊन जाईल. तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर बिहार विधानसभा निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तसेच सुशील मोदीजी हे नाराज नाही आहेत. पक्षाकडून त्यांच्या बद्दल विचार करत त्यांना नवी जबाबदारी दिली जाईल असे ही फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. (Bihar सह देशातील 11 राज्यांतील पोटनिवडणुकांमध्ये BJP ला मिळालेले यशहे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वासाची लहर हे सिद्ध करतं- देवेंद्र फडणवीस)

याआधी सुद्धा फडवणीस यांनी NDA ची सत्ता पुन्हा एकदा बिहारसह 11  राज्यांच्या पोटनिवडणूकीमध्ये भाजपला विजय मिळाल्याने सर्व जनतेचे आभार ही मानले होते. त्याचसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेचा असलेला विश्वास हा अद्याप कायम असल्याचे ही त्यांनी एका ट्विट मध्ये म्हटले होते. तसेच बिहारच्या जनतेने दाखवून दिले की, त्यांना राज्यात विकास हवा असून जंगलराज नाही आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाने पुन्हा एकदा विजय मिळवल्याचा आनंद ही फडणवीस यांनी व्यक्त केला होता.