Devendra Fadnavis: लोकशाहीत चर्चेला स्थानच नाही का? राणा दाम्पत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारला सवाल

विदर्भातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 50 हजार हेक्टरी मदत व लॉकडाऊन काळातील विजेचे बिल अर्धे माफ करावे. या मागण्यांसाठी आमदार रवी राणा (Ravi Rama) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी आज मुंबईला निघणार होते.

Devendra Fadnavis: लोकशाहीत चर्चेला स्थानच नाही का? राणा दाम्पत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारला सवाल
Devendra Fadnavis | (PTI)

विदर्भातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 50 हजार हेक्टरी मदत व लॉकडाऊन काळातील विजेचे बिल अर्धे माफ करावे. या मागण्यांसाठी आमदार रवी राणा (Ravi Rama) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी आज मुंबईला निघणार होते. राणा दाम्पत्य उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थासमोर आंदोलन करणार होते. मात्र, त्याआधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ”आंदोलन केले की अटक, कुणी काही बोलले की अटक, हे थांबणार केव्हा? लोकशाहीत चर्चेला स्थानच नाही का?” असा प्रश्न फडणवीस यांनी विचारला आहे.

शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली, म्हणून आंदोलन केले तर कारागृहात डांबले! शेतकऱ्यांचे निवेदन घेऊन ‘मातोश्री‘वर भेटण्यासाठी रेल्वेने निघाले, तर खा. नवनीत राणा आणि आ. रवी राणा अमरावतीत पुन्हा स्थानबद्ध! 25-50 हजार हेक्टरी मदतीच्या गप्पा करणाऱ्यांना शेतकऱ्यांचा इतका तिरस्कार का? निवेदन स्वीकारून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा केली असती, त्यांचे दुःख समजून घेतले असते, तर किमान आपले म्हणणे ऐकून घेतल्याचे तर समाधान शेतकऱ्यांना मिळाले असते. आंदोलन केले की अटक, कुणी काही बोलले की अटक, हे थांबणार केव्हा? लोकशाहीत चर्चेला स्थानच नाही का?, असा सवाल देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Amruta Fadnavis Tweet: लक्ष्मीपूजन निमित्त अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काय मागितले? पाहा ट्वीट

देवेंद्र फडणवीस यांचे ट्वीट-

“शेतकऱ्यांसाठी आवाज उचलला म्हणून तीन दिवस जेलमध्ये ठेवले. शेतकऱ्यांनाही अटक केली. आता मुंबईत जाण्यापासून रोखले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात हुकूमशाही चालवली आहे. अशाप्रकारच्या हुकुमशाहीमुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू व्हावे, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे”, असे आमदार रवी राणा म्हणाले आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Nov 16, 2020 12:14 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).