बिहार विधानसभा निवडणूक 2020 (Bihar Assembly Election 2020) सह 11 राज्यांतील पोटनिवडणुकांमध्येही NDA आघाडी घेत घसघशीत विजय मिळवला. यावरुन देशात अजून मोदींची लाट कायम असल्याचे चित्र समोर आले आहे. या यशानंतर देशासह महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी देखील आनंद व्यक्त केला. यात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बिहारमध्ये NDA ची सत्ता पुन्हा आल्याने सर्व जनतेचे आभार मानत येथील नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर विश्वासाची लहर अजूनही कायम आहे असेही फडणवीसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
या निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे देवेंद्र फडणवीस यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे. 'बिहारच्या जनतेने हे दाखवून दिले की त्यांना राज्यात विकास हवा आहे, जंगलराज नाही. आपले पंतप्रधान नोदींच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा मोहर लागली गेली आहे. नितीशकुमारांवर जनेतेने आपल्या विश्वास कायम ठेवल्याने मी त्यांचे आभार मानतो' असेही देवेंद्र फडणवीसांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
हेदेखील वाचा- Bihar Assembly Elections 2020 Results: बिहार मध्ये NDA ला स्पष्ट बहुमत;RJD ठरला सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष
धन्यवाद बिहार!
बिहार कि जनता ने यह साफ कर दिया है की वे विकास चाहते है,ना की जंगलराज!
हमारे जनप्रिय प्रधानमंत्री मा@narendramodi जी इनके नेतृत्व पर मोहर लगायी है।@NitishKumarजी पर सम्पूर्ण विश्वास दिखाया है।मैं बिहार की जनता का कोटि कोटि अभिनंदन करता हूँ,उन्हें अभिवादन करता हूँ।
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 10, 2020
बिहारच्या मतदारांनी एनडीएला स्पष्ट बहुमत दिले आहे. तर राजद हा सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला आहे. 243 जागांसाठी झालेल्या विधानसभा निवडणूकीमध्ये सत्तास्थापनेसाठी 122 जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे 124 जागा मिळवलेल्या एनडीएला (NDA)आता सत्तास्थपानेचा मार्ग मोकळा आहे. एनडीएमध्ये भाजपला (BJP) 74, जेडीयू (JDU) ला 43, मित्रपक्षांना 8 जागा मिळाल्या आहेत. तर एनडीएला तगडी टक्कर देणार्या महागठबंधनला (Mahagathabandhan) 110 जागा मिळाल्या आहेत. यामध्ये राजदने(RJD) बाजी मारत 75 जागा मिळवल्या आहेत तर कॉंग्रेसने (Congress) 19 आणि डाव्यांनी 16 जागांवर विजय मिळवला आहे. यासोबतच बिहारमध्ये ओवेसींच्या एमआयएमला 5, चिराग पासवासनच्या लोजद ला 1 आणि अपक्ष एका जागेवर निवडून आले आहेत.