पुणे आणि चिंचवडमधील कॅब चालकांनी (Cab Driver) कामबंद आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या 20 फेब्रुवारीपासून शहरातील ओला उबेरची सेवा (Ola and Uber Service) बंद राहणार आहे. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कॅब चालकांकडून पुणे येथील आरटीओ ऑफिस (Pune RTO Office) येथे निदर्शने करण्यात येणार आहेत. 20 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या कामबंद आंदोलनात शहरातील जवळपास 20 हजारांहून अधिक कॅबचालक सहभागी होणार, असा दावा डॉ. केशव क्षीरसागर यांनी केला आहे. (हेही वाचा - Dombivili Crime: भाडे देण्याच्या वादातून डोंबिवलीत ओला चालकाला प्रवाशाची मारहाण)
कॅब कंपन्यांसाठी 1 जानेवारी 2024 पासून नवीन दरपत्रक जाहीर केले होते. मात्र ओला, उबर कंपन्यांनी नवीन दराची अद्याप अंमलबजावणी केली नाही, परिणामी आम्हाला फटका बसत असल्याचं कॅब चालकांनी म्हटलं आहे. नवीन दर लागू झाल्यास कॅब चालकांना मिळणाऱ्या कमिशनमध्ये वाढ होईल, आणि वाढीव दराचा व्यवसायावर परिणाम होईल. या भीतीने कॅब सेवा देणाऱ्या कंपन्या दर लागू करत नाहीये, असा आरोपही कॅब चालकांनी केला आहे.
20 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या कामबंद आंदोलनात शहरातील जवळपास 20 हजारांहून अधिक कॅबचालक सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. RTO पुणे येथे तीव्र निदर्शने व बेमुदत बंद आंदोलन करण्यात येईल. जोपर्यंत कंपन्या या दराची अंमलबजावणी करीत नाहीत, तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेऊ, असा इशाराच कॅबचालकांनी दिला आहे.