Close
Search

Dombivili Crime: भाडे देण्याच्या वादातून डोंबिवलीत ओला चालकाला प्रवाशाची मारहाण

या घटनेची चालक सुनीलकुमार यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. पोलीस उपनिरीक्षक के. पी. गांगुर्डे तपास करत आहेत.

महाराष्ट्र Amol More|
Dombivili Crime: भाडे देण्याच्या वादातून डोंबिवलीत ओला चालकाला प्रवाशाची मारहाण
Crime | (File image)

डोंबिवलीत एमआयडीसीतील विको नाका भागात एका ओला कार चालकाला एका प्रवाशाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत चालकाला गंभीर दुखापत झाली आहे. सुनीलकुमार राजदेव यादेव (45) असे ओला कार चालकाचे नाव आहे. तो दावडी गावात राहतो. रफिक शेख असे प्रवाशाचे नाव असून तो सोनारपाडा भागात राहतो. सुनीलकुमार प्रवासी वाहतूक करणाऱ्या ओला कंपनीत चालक म्हणून काम करतात. रविवारी रात्री पावणेबारा वाजता प्रवासी रफिक शेख यांनी ऑनलाईन सुनीलकुमार यांची कार बुक केली होती.  (हेही वाचा - Bhiwandi Crime: भिवंडीत नकली बंदुकीने दहशत माजवणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल, बंदूकही जप्त)

नवी मुंबई वाशी बाजार समिती ते सोनारपाडा अशी ही ओला कार बुक केली होती. ओला कार चालकाने रफिक यांना डोंबिवली एमआयडीसीतील विको नाका भागात सोडले. प्रवास संपल्यानंतर भाड्याचा विषय आला. त्यावेळी प्रवासी रफिक यांनी चालकाबरोबर वाद घातला. या वादातून रफिकने हातमधील वस्तूचा फटका चालक सुनीलकुमार यांच्या चेहऱ्यावर मारला. या मारहाणीत तो चालक जखमी झाला.

या  घटनेची चालक सुनीलकुमार यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. पोलीस उपनिरीक्षक के. पी. गांगुर्डे तपास करत आहेत.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change