gun shot representative image PC Pixa

राज्यात सध्या गोळीबाराची घटना वारंवार घडताना दिसून येत आहे. उल्हासनगरमध्ये पोलीस ठाण्यात गोळीबाराची घटना झाल्यानंतर बोरीवलीत देखील ठाकरे गटाच्या नेत्याची गोळी मारून हत्या करण्यात आली होती. यानंतर काल पुण्यात देखील गोळीबाराची घटना घडली होती. अशीच घटना भिंवडीत घडली आहे. भिवंडी शहरात नकली बंदुकीच्या माध्यमातून दहशत (Bhiwandi Firing) पसरवण्याचा प्रकार घडला आहे. दोघा तरुणांमध्ये एका जुन्या वादातून  हाणामारी झाल्याच्या घटनेनंतर हवेत गोळीबार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.  (हेही वाचा - Pune Shocker: पुण्यात पैशाच्या वादातून गोळीबार, गोळी झाडून स्वत:ही संपवलं जीवन)

घटनेची माहिती मिळताच निजामपूर पोलिसांनी दोन्ही गटाच्या तरुणांवर अदखल पात्र गुन्हा दाखल करत बंदूक जप्त केली. त्यानंतर पोलिसांच्या लक्षात आले की ही बंदूक खरी नसून खोटी बंदूक आहे. सध्या पोलिसांनी ही एअर गनदेखील जप्त केली आहे. या घटनेचा व्हिडीओ ृ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नारायण भोईर यांचा पुतण्या उमेश भोईर आणि कृष्णा चव्हाण हे दोघे एकमेकांचे मित्र आहेत. भिवंडी शहरातील ठाणगेआळी परिसरात कृष्णा चव्हाण याने तुषार खाडेकर याने नारायण काका बरोबर तू का उगाच भांडण करतो? असा प्रश्न विचारला. यावरून कृष्णा आणि तुषार खाडेकर यांच्यात बाचाबाची होऊन भांडण सुरू झाले.