Bengaluru Traffic Rules: नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एनसीआरबी (NCRB) अहवालात, वाहतूक नियमांचे (Traffic Rules) उल्लंघन हे बहुतेक रस्ते अपघातांचे कारण असल्याचे म्हटले आहे. भारतामध्ये अशी अनेक शहरे आहेत जिथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक नियमांचे उल्लंघन होते. मुंबई, दिल्ली, बेंगळूरूसारख्या (Bengaluru) गर्दीच्या ठिकाणी तर सर्रास असे नियम मोडले जातात. तर रस्ते अपघात रोखण्यासाठी एक नवीन पाऊल म्हणून, वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना लगाम घालण्यासाठी हटके योजना आखली आहे.
यानुसार एखादा कर्मचारी वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास पोलीस थेट त्याच्या बॉसकडे याबाबत तक्रार करतील आणि त्त्याला त्याने नियम का मोडले याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल. या मोहिमेची सुरुवात बेंगळुरूमध्ये झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी ही मोहीम सुरू करण्यात आली होती.
वाहतूक पोलिसांनी नुकतेच सर्जापूर आणि व्हाईटफिल्ड परिसरात ही मोहीम सुरू केली आहे. हे महादेवपुरा वाहतूक पोलीस विभागांतर्गत येते, जिथे मोठ्या प्रमाणात आयटी कंपन्या आहेत. या मोहिमेअंतर्गत एखाद्या कर्मचाऱ्याचे वाहन पार्किंग नसलेल्या ठिकाणी गाडी पार्क केली किंवा त्याने इतर कोणत्या वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास, याबाबत लगेच त्याच्या बॉसकडे व्हॉट्सअॅपवर तक्रार केली जाईल.
Caught breaking traffic rules in Bengaluru? You may soon have to explain it to your boss#Bengalurupolice #Trafficpolice pic.twitter.com/7svwJPI3IA
— Khursheed Baig (@khursheed_09) December 16, 2023
महादेवपुरा वाहतूक पोलीस निरीक्षक रमेश आर म्हणाले की, या मोहिमेअंतर्गत बॉसकडे तक्रार केल्यानंतर तरी कर्मचाऱ्यांना वाहतूक नियमांची जाणीव होते की नाही हे पाहायचे आहे. वाहतूक पोलिस वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कर्मचाऱ्याच्या बॉसकडे तक्रार म्हणून चालान पाठवत आहेत. पोलिसांचे म्हणणे आहे की, या मोहिमेअंतर्गत कोणालाही वैयक्तिक माहिती दिली जात नाही, उलट एखाद्या व्यक्तीने किती वेळा नियमांचे उल्लंघन केले आहे याची तक्रार केली जाते. (हेही वाचा: Woman Saree Gets Stuck On Train Doors: दिल्ली मेट्रोच्या दरवाजात साडी अडकल्याने 35 वर्षीय महिलेचा मृत्यू)
दरम्यान, टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स रँकिंग 2022 मध्ये, बेंगळुरू शहराला जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक गर्दीचे स्थान मिळाले आहे. शहराच्या मध्यभागी 10 किमी अंतर पार करण्यासाठी चालकांना सरासरी 29 मिनिटे आणि 10 सेकंद लागतात. बेंगळुरूचे ड्रायव्हर वर्षभरात तब्बल 260 तास (जवळपास 11 दिवस) गर्दीच्या वेळेत ट्रॅफिकमध्ये अडकतात.